मासळी पकडण्यास गेलेला गुडे-शिवोलीतील तरुण बुडाला

The young man from Guide Siolim who had gone to catch fish drowned
The young man from Guide Siolim who had gone to catch fish drowned
Published on: 
Updated on: 

शिवोली: गुडे-शिवोली येथील सर्वेश शिरोडकर(Sarvesh Shirodkar) या तरुणाचा नजीकच्या हुडोवाडा-दांडा येथील किनारी बुधवारी दुपारी बुडाला. संध्याकाळी उशिरापर्यंत सर्वेशचा शोध घेण्याचे प्रयत्न स्थानिकांकडून चालू होते. हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोलान-शिवोली येथील दोघे तरुण सर्वेशसह हुडोवाडा-दांडा येथील हिंदू स्मशानभूमी परिसरातील समुद्रकिनारी(Beach) बुधवारी सकाळी मासळी पकडण्यासाठी समुद्रात उतरले होते व तासभर प्रयत्न करूनही मासळी न मिळाल्याने ते किनारी परतत असताना अचानक समुद्राचे पाणी भरतीच्या वाटेने समोर आले. यावेळी घोलान, मार्ना-शिवोली येथील दोघा तरुणांनी कसाबसा आपला जीव वाचवला व किनाऱ्यावर परतले. परंतु मागून येणाऱ्या सर्वेश समुद्राच्या लाटांसह आत ओढला जावून तो बेपत्ता झाला.(The young man from Guide Siolim who had gone to catch fish drowned)

दरम्यान, संध्याकाळी उशिरापर्यंत स्थानिक व हणजूण पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी शिवोली पोलिसांच्या सहकार्याने सर्वेशचा शोध घेण्याचे प्रयत्न चालू ठेवले होते. मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागू शकला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा सर्वेशचा शोध घेतला जाणार असल्याचे निरीक्षक सूरज गावस यांनी सांगितले.

दरम्यान, मंगळवारी दुपारी बामणवाडा-शिवोलीत भाडयाच्या घरात राहाणाऱ्या यल्लुबाई होंगल या कर्नाटकी महिलेचा याच परिसरात तोल जाऊन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या चोवीस तासातच शिवोलीतील ही बुडाल्याची दुसरी घटना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BJP plans to increase women representation in Goa Assembly
Bank fraud of 75 lakh rupees in Goa
Goa Bicholim marigold flower cultivation
Farmers demand rejection of mining NOC in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com