Accidental death
Accidental death Dainik Gomantak

पार्किंग कारमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचा मृत्यू ह्रदयविकाराने

मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे तज्ज्ञांच्या अहवालातून स्पष्ट
Published on

पणजी : राजधानी पणजीत काल पार्किंग क्षेत्रात कारमध्ये मृतावस्थेत आढळला होता. कर्नाटकातील या तरुणाचा मृत्यू हृदयविकाराने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात स्पष्ट झाले. अशी माहिती पणजीचे पोलिस निरीक्षक निखिल पालयेकर यांनी दिली. (Young man found dead in parking car dies of heart attack )

पार्किंग केलेल्या कर्नाटक मधील कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. त्या कारमध्ये सापडलेल्या वाहन चालक परवान्याच्या आधारे श्रीकांत काचगार ची ओळख पटली होती. त्याच्या कुटुंबीयांना माहिती देऊन मृतदेह गोमेकॉ शवागारात ठेवला होता. आज सकाळी त्याचे नातेवाईक गोव्यात आल्यावर मृतदेह त्यांना दाखवण्यात आला. पोलिसांनी त्यांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पुन्हा पंचनामा केला.

Accidental death
धक्कादायक! कोलवाळ जेलचा सुरक्षारक्षकच ड्रग्जच्या धंद्यात

मृतदेहावर कोणत्याही जखमा नव्हत्या. त्याला विविध आजार असल्याचे नातेवाईकांनीच पोलिसांना सांगितले. फॉरेन्सिक विभागाच्या डॉक्टरांनी केलेल्या शवचिकित्सेत त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाल्याचे स्पष्ट केले. नातेवाईकांनीही त्याला हरकत घेतली नाही. सर्व सोपस्कार पूर्ण करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला, असे पालयेकर यांनी सांगितले.

दरम्यान, काल मृतदेह शेजारी पोलिसांना काल औषधांचा बॉक्स सापडला होता तसेच तो उपचार घेत असलेल्या आजारासंबंधीचे केस पेपर्स कारमध्ये सापडले होते. त्यावरून पोलिसांनी प्रथमदर्शनी हा अनैसर्गिक मृत्यू असल्याचा अंदाज व्यक्त केला होता. नातेवाईकांशी काल पोलिसांनी केलेल्या संपर्कातही त्याचा मृत्यू जर्जर आजारामुळे झाला असल्याची शक्यता वर्तविली होती. कर्नाटकातून आणलेली कार त्याचीच होती व ती पत्नीच्या नावावर असल्याने ती पोलिसांनी कुटुंबीयांच्या ताब्यात दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com