International Yoga Day : योगासनांमुळे होतो बुद्धीचा विकास: आमदार चंद्रकांत शेट्ये

डिचोलीत योग दिवस उत्साहात साजरा
Chandrakant Shetye
Chandrakant ShetyeDainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim : योग ही पुरातन कला आहे. या कलेला भारतीय संस्कृतीत महत्वाचे स्थान आहे. योगासने केल्याने मानसिक ताणतणाव दूर होतानाच, शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहते. त्याचबरोबर बुद्धीचा विकास होतो, असे मत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी व्यक्त केले.

डिचोली लायन्स क्लबच्या सहकार्याने पतंजली योग समितीतर्फे डिचोलीत आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त पहाटे हिराबाई झांट्ये स्मृती सभागृहात आयोजित कार्यक्रमात शेट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक सुदन गोवेकर, पतंजली योग समितीच्या संध्या खानोलकर, भारतेश गुळणवार उपस्थित होते.

Chandrakant Shetye
Goa Ranji Coach: मुंबईचे विनोद राघवन गोव्याचे रणजी प्रशिक्षक; ‘जीसीए’कडून नियुक्ती

उद्‌घाटन सत्रानंतर बाळकृष्ण नाईक आणि अन्य योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्राणायम, योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. उपस्‍थित मान्‍यवरांनी त्‍यात सहभाग घेतला. ज्येष्ठ साधकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंगल योग सेवा वर्गाच्या चिमुकल्यांनी कठीण योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांना अचंबित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com