डिचोली: योगासने केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य तंदुरुस्त राहते. त्याचबरोबर बुद्धीचा विकास होतो, असे मत माजी सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त दीनदयाळ आयुर्वेदिक चिकित्सालय आणि पंचकर्म केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने डिचोली भाजप मंडळातर्फे आयोजित योगदिन कार्यक्रमात ते बोलत होते. (Yoga keeps mental and physical health healthy - Rajesh Patnekar )
उद्घाटन सत्रानंतर योग प्रशिक्षक प्रियांका पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग साधकांकडून योगासनांची प्रात्यक्षिके करण्यात आली. पाटणेकर यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक नीलेश टोपले, वल्लभ साळकर, डॉ. कौस्तुभ पाटणेकर, अर्जुन माळगावकर, विश्वास गावकर, सूर्यकांत देसाई, विश्वास गावस आदी भाजप कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. त्यांनीही योगासने केली.
स्वतःचेच विक्रम मोडणारा अवलिया
डॉ. पंकज सायनेकर या युवकाला आवड आणि छंद आहे ती केवळ योगासनांची. या अवलियाने आजतागायत स्वतःचेच तीन विश्वविक्रम मोडले आहेत. आता चौथा विश्वविक्रम मोडला आहे. आणि याची विश्वविक्रमाची नोंद हारवर्ड वर्ल्ड रिकॉर्डस्मध्ये नोंद झाली आहे. आजतागायत पंकजने चारवेळा सूर्यनमस्कारांचे वेगवेगळे विक्रम करून गोमंतकीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे, असेच म्हणावे लागेल.
21 जून हा जागितक योग दिन तसेच जागतिक संगीत दिनदेखील असल्याने 2संगीतयोग 2 अशी संकल्पना सुचली. त्या अनुषंगाने आज सकाळी 20 रोजी सकाळी 10 ते 21 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत सलग 24 तास सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम व सायंकाळी सांगितिक कार्यक्रम पार पडला, गेल्यावर्षी २४ तासांमध्ये ५४४५ सूर्यनमस्कार घातले होते. तर यंदा 5598 सूर्यनमस्कार केले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.