Xeldem Jatra : तब्बल 12 वर्षांच्या खंडानंतर महाजत्रोत्सवास प्रारंभ

कुडचडेच्या शेल्डे येथील सातेरी शांतादुर्गा देवस्थानाच्या महाजत्रोत्सवाची सुरुवात परंपरेनुसार झाली
Xeldem Sateri Shantadurga Temple
Xeldem Sateri Shantadurga TempleDainik Gomantak

Xeldem Jatra : कुडचडेच्या शेल्डे गावातील महाजत्रोत्सवाची सुरुवात परंपरेनुसार झाली. तब्बल १२ वर्षांच्या खंडानंतर सातेरी शांतादुर्गा देवस्थानाच्या जत्रोत्सव होत असतो. या महाजत्रोत्सवाचे वेध ग्रामस्थांना लागले होते. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. हा महाजत्रोत्सव ३० जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. शुक्रवारी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री व आमदार उपस्थित होते.

Xeldem Sateri Shantadurga Temple
Mahadayi Water Dispute : रिव्हॉल्युशनरी गोवन्स वगळता विरोधक एकवटले; विर्डीत होणार म्हादई बचावचा एल्गार

सातेरी शांतादुर्गा देवस्थानाच्या जत्रोत्सव २०११ मध्ये झाला होता. त्यानंतर यंदा २०२३ मध्ये तब्बल १२ वर्षांच्या खंडानंतर जत्रोत्सव होणार आहे. या महाजत्रोत्सवाचे वेध ग्रामस्थांना लागले होते. पूर्वजांच्या प्रथा परंपरेनुसार महाजन, ग्रामस्थ व भक्तगणांना महानैवेद्य शुक्रवारी सायंकाळी देण्यात आला. त्यानंतर हा जत्रोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे गावातील ग्रामस्थांनी सांगितले. या महाजत्रोत्सवात लोकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे देवस्थान समितीतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Xeldem Sateri Shantadurga Temple
Olive Ridley Turtle: कासव आले खरे पण अंडी न घालताच माघारी परतले; विश्वजीत राणेंनी दिला गंभीर ईशारा

दरम्यान, शुक्रवारी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महाप्रसादाचा आस्वाद मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री नीलेश काब्राल, मंत्री सुभाष फळदेसाई, आमदार राजेश फळदेसाई, उल्हास तुयेकर उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com