Damodar Mauzo: लेखकांनी इतर भाषेतील साहित्य वाचावे

माया खरंगटे यांचा कोकणी लेखक संघातर्फे गौरव
Damodar Mauzo
Damodar MauzoDainik Gomantak
Published on
Updated on

वाचन संस्कृती जपणे, जागृती करणे व त्यात वाढ करणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व भाषांतील साहित्यिकांमध्ये ऐक्य जपणे सुद्धा आवश्यक असून विचारांच्या आदानप्रदानाचीही तेवढीच गरज आहे. त्यामुळे लेखकांनी इतर भाषेतील साहित्य वाचायला हवे, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त दामोदर मावजो यांनी केले.

Damodar Mauzo
सुपारी गळतीमुळे होते वार्षिक 10 टक्के नुकसान; रोगप्रतिबंधक औषध फवारण्या केल्या तरी फरक नाही

हल्लीच कोकणी लेखक संघाच्या वतीने कोकणी भाषा मंडळाच्या सभागृहात साहित्य पुरस्कार विजेत्या साहित्यिका माया अनिल खरंगटे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावजो बोलत होते. सन्माननीय अतिथी म्हणून साहित्यिका नुतन साखरदांडे उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरवात माधवी बांदोडकर यांनी गायिलेल्या शारदा स्तवनाने झाली. कोकणी लेखक संघाचे अध्यक्ष गौरीश वेर्णेकर यांनी सर्वांचे स्वागत केले.

मावजो यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व मानपत्र प्रदान करून माया खरंगटे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी माया खरंगटे यांच्यावरील चित्रफितीचे सादरीकरण झाले. तिच्या विविध पुस्तकांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. मानपत्राचे वाचन अल्का असोल्डेकर, सूत्रसंचालन वैष्णवी रायकर तर कोकणी लेखक संघाचे खजिनदार मिलिंद भरणे यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com