World Organ Donation Day 2024: गोव्यात 1200 लोकांची स्वेच्छेने अवयव दानासाठी नोंदणी; 10 मूत्रपिंड प्रत्यारोपण

World Organ Donation Day 2024: जिवंत अवयव दाता हा १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचा असणे कायद्यानुसार आवश्‍यक आहे.
World Organ Donation Day 2024: गोव्यात 1200 लोकांची स्वेच्छेने अवयव दानासाठी नोंदणी; 10 मूत्रपिंड प्रत्यारोपण
World Organ Donation Day 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

World Organ Donation Day 2024

पणजी: राज्यात अवयवदानाला चालना मिळावी म्हणून दरवर्षी जागतिक अवयवदान दिनानिमित्त लोकांमध्ये जनजागृती केली जाते. मृत्यूनंतर अवयवदान करण्यासारखे मोठे सामाजिक कार्य नाही. अवयदानासंदर्भात लोकांना महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

२०१९ मध्ये राज्य अवयव प्रत्यारोपण व ऊतक संघटना (सोटो) स्थापन झाल्यापासून आतापर्यंत गोव्यातील सुमारे १२०० लोकांनी स्वेच्छेने अवयव दानसंदर्भात नोंदणी केली आहे; तर ६८ रुग्ण मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.

गोमेकॉ इस्पितळातील ‘सोटो’ या विभागाच्या सल्लागार डॉ. श्रद्धा केरकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, राज्यात अवयवदान संदर्भात विविध स्तरावर कार्यक्रम आयोजित करून त्याची जागृती करण्यात येत आहे.

आतापर्यंत राज्यातील विविध सरकारी व खासगी इस्पितळांच्या माध्यमातून तसेच आरोग्य खाते, सामुदायिक आरोग्य केंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्यामार्फत वेळोवेळी कार्यक्रम आयोजित करून लोकांना अवयवदानासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात येते.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे यकृत, मूत्रपिंड, फुफ्फुस, हृदय व कोर्निया हे अवयव दान केल्यास अवयव निकामी झालेल्या व्यक्तीला प्रत्यारोपण केल्यास जगण्याचा नवा आनंद मिळू शकतो, तसेच त्याचे जीवनही आनंदमय होऊन जाते. याची कल्पना जनजागृती कार्यक्रमांतून लोकांना देण्यात येते.

जिवंत अवयव दाता हा १८ वर्षांपेक्षा अधिक वयाचा असणे कायद्यानुसार आवश्‍यक आहे. हयात अवयव दानकर्ता हा आपल्या नातेवाईकालाच अवयव दान करू शकतो.

सरकारतर्फे विविध स्तरावर अवयवदानसंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन जनतेत अवयव दानसंदर्भात असलेला गैरसमज दूर होत असला तरी ‘सोटो’ विभागाकडे नोंद झालेल्या नोंदणीवरून त्याचे प्रमाण खूप कमी आहे. अजूनही लोक आपल्या मृत्यूपश्‍‍चात अवयव दान करण्यासाठी इच्छा दर्शवत नाहीत. अवयव दान हे स्वेच्छेने करायचे असल्याने त्यासाठी मोठ्या स्तरावर जनजागृतीची गरज आहे व ती या विभागातर्फे वेळोवेळी सुरू आहे.

एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याने मृत्यूपूर्वी अवयव दानसंदर्भात नोंदणी केलेली असेल किंवा मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबीयांनी अवयवदान करण्याची इच्छा व्यक्त केल्यास काही तासांतच अवयव काढून ते लगेच ज्या ठिकाणी त्याची आवश्‍यकता आहे तेथे पोहोचवले जातात.

आतापर्यंत गोव्यात १० मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. सरकारी इस्पितळात ९ तर खासगी इस्पितळात १ व्यक्तीच्या मृत्यूनंतर अवयव प्रत्यारोपण करण्यात आले. ४ पुरुष व १ महिलेचे अवयव काढण्यात आले. त्याचा ८ पुरुष व २ महिला रुग्णांना फायदा झाला आहे.

World Organ Donation Day 2024: गोव्यात 1200 लोकांची स्वेच्छेने अवयव दानासाठी नोंदणी; 10 मूत्रपिंड प्रत्यारोपण
Margao Traffic: मडगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील, कोंडी सोडविण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी

सर्वाधिक कमी वयाचा अवयव दान केलेला १९ वर्षांचा तर अवयव मिळालेला लाभार्थी २७ वर्षाचा आहे. सर्वाधिक अधिक वयाचा अवयव दान केलेला ६१ वर्षाचा तर अवयव मिळालेला लाभार्थी ५० वर्षाचा होता. आतापर्यंत १८ मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपण झाले आहे. त्यामध्ये १० रुग्णांना मूत्रपिंड, ४ जणांना फुफ्फुस, ३ जणांना ह्रदय, एकाला यकृत (दोन्ही) प्रत्यारोपण केली आहेत.

एएसजी इस्पितळ व हेल्थवे इस्पितळात १८ कोर्निया प्रत्यारोपण झाले आहे. त्यातील १२ पुरुषाना व १७ महिलांना त्याचा लाभ झाला आहे.

सर्वाधिक कमी वयाचा प्रत्यारोपण झालेला १९ वर्षाचा तर सर्वाधिक अधिक वयाचा लाभ मिळालेला रुग्ण ८७ वर्षाचा आहे. गोव्याच्या सोटो विभागाकडे अवयवच्या प्रतीक्षेत असलेल्यांची संख्या ६८ असून त्यामध्ये ४१ पुरुष व २७ महिला आहेत. त्यामध्ये सर्वाधिक कमी वयाचा रुग्ण २५ वर्षाचा तर सर्वाधिक अधिक वयाचा रुग्ण ६९ वर्षे आहे.

World Organ Donation Day 2024: गोव्यात 1200 लोकांची स्वेच्छेने अवयव दानासाठी नोंदणी; 10 मूत्रपिंड प्रत्यारोपण
GMC Organ Donation: गोव्यात ब्रेन डेड युवकाचे अवयवदान, देशाच्या तीन शहरातील चौघांना जीवदान

गोमेकॉ, हेल्थ-वे इस्पितळ, मणिपाल इस्पितळ व एएसजी इस्पितळ ही चार इस्पितळे अवयव प्रत्यारोपणसाठी राज्यात नोंदणीकृत आहेत.

गोमेकॉत मूत्रपिंड, हेल्थ-वे इस्पितळात मूत्रपिंड व कोर्निया, मनिपाल इस्पितळात मूत्रपिंड तसेच एएसजी इस्पितळात कोर्नियाचे प्रत्यारोपण करण्याची शस्त्रक्रिया करण्यात येते.

गोव्यात आतापर्यंत हयात अवयव दात्यांकडून ४६ जणांना मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले असून त्यातील २२ गोमेकॉत तर २४ खासगी इस्पितळात करण्यात आले आहे.

World Organ Donation Day 2024: गोव्यात 1200 लोकांची स्वेच्छेने अवयव दानासाठी नोंदणी; 10 मूत्रपिंड प्रत्यारोपण
Organ Donation: दातृत्वाला सलाम ! 'त्या' 5 जणांच्या निर्णयामुळे 19 जणांना जीवदान

खासगी इस्पितळातमध्ये हेल्थ-वे इस्पितळ (२०) तर मणिपाल इस्पितळ (४) समावेश आहे. यामध्ये १५ पुरुष व ३१ महिला दात्यांनी अवयव दान केले ते ३२ पुरुष व १४ महिलांना हे अवयव मिळाले.

सर्वाधिक कमी वयाचा अवयवदान कर्ता ३३ वर्षांचा, अवयव प्रत्यारोपण झालेला १५ वर्षांचा आहे. सर्वाधिक अधिक वयाचा दाता ६९ वर्षांचा तर अवयव प्रत्यारोपण झालेला ६६ वर्षांचा आहे.

पत्नीने पतीला- १७, पतीने पत्नीला- ७, आईने मुलाला- ११, मुलीला- २, वडिलांनी मुलाला- ३, मुलीला- ४ तर भावाने बहिणीला व बहिणीने भावाला दिलेले प्रत्येकी १ अवयव दानकर्ते आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com