Organ Donation
Organ DonationDainik Gomantak

Organ Donation: दातृत्वाला सलाम ! 'त्या' 5 जणांच्या निर्णयामुळे 19 जणांना जीवदान

अवयवदात्यांचा गौरव: राज्यपाल,आरोग्यमंत्र्यांची उपस्थिती
Published on

Organ Donation ब्रेन डेड झालेल्या पाच रुग्णांच्या नातेवाईकांनी घेतलेल्या पुढाकारामुळे 19 रुग्णांना नवे जीवदान मिळाले. आज नमन दिवस निमित्ताने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या हस्ते या कुटुंबीयांचा सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

राज्यात अवयव दान केलेल्या चार कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपाल पिल्लई, आरोग्य मंत्री राणे यांच्यासह खात्याचे सचिव अरुण कुमार मिश्रा, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, संचालक डॉ.गीता काकोडकर, ‘नोटो’चे सचिव अनिलकुमार , संयुक्त सचिव प्रीती वर्गीस,डॉ. मधुमोहन प्रभुदेसाई, डॉ.मोहन धामस्कर उपस्थित होते.

प्रद्युम्न सोनी, अंगद सरोज, शीला मोराईस आणि विश्राम रेडेकर या रुग्णांच्या नातेवाईकांच्या पुढाकारामुळे 16 रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

अवयवदानाच्या उदात्त कार्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘गोमेकॉ’ च्या डॉक्टरांचे मी मनापासून कौतुक करतो. अवयवदान एक श्रेष्ठदान आहे. ज्या उदार कुटुंबांनी गरजू व्यक्तीला जीवनाची दुसरी संधी दिली आहे, त्यांना आम्ही सलाम करतो.

आजचा दिवस केवळ उत्सवच नाही तर अतुलनीय चांगल्या गोष्टीची आठवण करून देणारा आहे. प्रत्यारोपण टीमचा आणि ‘एचएलए’ च्या प्रभारी यांचा सत्कारही तितकाच आनंददायी होता. -विश्वजित राणे, आरोग्य मंत्री

‘मणिपाल’मुळे तिघांना जीवदान

केंद्र सरकारच्या ‘अवयव दान श्रेष्ठ दान’ या योजनेअंतर्गत चार रुग्णांचे 16 अवयव दान केले होते. यापूर्वी मणिपाल रुग्णालयाने एका रुग्णाच्या तीन अवयवांचे यशस्वी रोपण केले होते त्यामुळे राज्यातील अवयव रोपणाची संख्या 19 होते. अशी माहिती आहे.

Organ Donation
Jr. NTR, जान्हवी आणि सैफच्या 'देवरा'चे गोव्यात होणार शूटिंग; दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शुभारंभ

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com