का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

World Heart Day 2024: हृदय व रक्तवाहिन्यांबाबतच्‍या रोगांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक हृदयदिन साजरा केला जातो
World Heart Day 2024: हृदय व रक्तवाहिन्यांबाबतच्‍या रोगांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक हृदयदिन साजरा केला जातो
World Heart Day 2024 Special StoryCanva
Published on
Updated on

World Heart Day Special Story

यशवंत सावंत

जागतिक हृदय दिवस हा दरवर्षी २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. हृदय व रक्तवाहिन्यांबाबतच्‍या रोगांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी तो साजरा केला जातो. हृदयरोगाबाबत लोकांना जागरुक करणे हा जागतिक हृदय दिवसाचा मुख्य उद्देश आहे.

गेल्या काही वर्षांपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्‍पितळात हृदयविकार शस्त्रक्रियांची संख्या वाढली आहे. २०२० ते २०२४ आतापर्यंत एकूण १७७२ हृदयशस्त्रक्रिया करण्‍यात आल्‍या. २०२० मध्ये ३०९ शस्त्रक्रिया तर २०२३ मध्ये ४५१ शस्त्रक्रिया झाल्‍या. हा वाढत क्रम पाहता कोरोना महामारीनानंतर हृदयविकाराच्या शस्त्रक्रियांमध्‍ये वाढ झाल्‍याचे दिसून येते.

गोमेकॉतील (GOMECO) हृदयरोग विभागाने यासंदर्भात अनेक कारणे व्‍यक्त केली आहेत. हृदयविकाराबाबत वाढलेली जागरूकता, काळजी घेण्यासाठी सुधारित प्रवेश आणि शस्त्रक्रिया तंत्रातील प्रगती यांचाही त्‍यात समावेश आहे. रुग्णांचे आरोग्‍य सुधारण्यासाठी विभागाने अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान उपलब्‍ध करून दिलेली आहे.

रक्त गोठण्याचे प्रकार वाढले!

कोरोना महामारीनंतर रक्त गोठण्याचे प्रकार वाढले आहेत, असे ढोबळमानाने निरीक्षण समोर आले आहे. अर्थात त्‍याला अधिकृत पुष्‍टी नाही. कोरोनानंतरच्या काळात हृदयविकार झटके आणि ‘स्ट्रोक’देखील वाढले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे मधुमेह (DIABETES) आणि उच्च रक्तदाबाच्या (High Blood Pressure) अनेक रुग्णांनी आवश्यक औषधे बंद केली, ज्याचा उलट परिणाम झाला. निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून भाज्या आणि फळे खाण्‍यास प्राधान्‍य देणे हितकारक आहे. मीठ आणि चरबीयुक्त जंकफूड टाळणे, नियमित व्यायाम करणे आणि नियमित आरोग्य तपासणी केली तर हृदयविकाराचा झटका आपण टाळू शकतो, असे मत मणिपाल इस्पितळच्या सल्लागार-इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्‍ट डॉ. ज्योती कुस्‍नूर यांनी व्यक्त केले आहे.

इतिहास काय सांगतो?

१९९८ मध्ये, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी ही इंटरनॅशनल कार्डिओलॉजी फेडरेशनमध्ये विलीन झाल्यानंतर वर्ल्ड हार्ट फेडरेशन (World Heart Federation) अस्तित्वात आले. प्रोफेसर अँटोनियो बायस डी लुना हे १९९७ ते १९९९ पर्यंत फेडरेशनचे अध्यक्ष होते. त्यांनीच जागतिक हृदय दिवस साजरा करण्याची कल्पना मांडली. कारण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग हा एक महत्त्वपूर्ण जागतिक आजार बनला होता. पहिला जागतिक हृदय दिवस २४ सप्टेंबर २००० रोजी साजरा करण्यात आला. २०११ पर्यंत सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा दिवस साजरा केला जात होता. परंतु २०१२ पासून तो २९ सप्टेंबरला साजरा करण्यात येऊ लागला.

जागतिक हृदयदिनाचे महत्त्‍व

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांच्‍या प्रतिबंधाबद्दल लोकांमध्ये जागरुकता निमार्ण करण्याबाबत जागतिक हृदय दिवस महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तसेच तंबाखू सेवन, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि बैठी जीवनशैलीशी संबंधित धोक्यांकडे तो लक्ष वेधतो, जे हृदयरोग आणि स्ट्रोकमुळे सुमारे ८० टक्के अकाली मृत्यूंना कारणीभूत ठरतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, वर्ल्ड हार्ट फेडरेशन हृदय-निरोगी जीवनशैलीच्या संकल्पनेला मूलभूत मानवी हक्क म्हणून प्रोत्साहन देते आणि जगभरात तिचा अवलंब करण्याचे समर्थन करते.

World Heart Day 2024: हृदय व रक्तवाहिन्यांबाबतच्‍या रोगांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी आणि या आजारांचा प्रभाव कमी करण्यासाठीच्या धोरणांना प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक हृदयदिन साजरा केला जातो
World Tourism Day: जागतिक पर्यटन दिनानिमित्त गोव्यात तीन ठिकाणी हेरिटेज वॉक; सहभागी होण्याची उत्कृष्ट संधी!!!

हृदयविकार म्हणजे काय?

आपल्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया हृदयाद्वारे केली जाते. अनेक धमन्यांद्वारे हे रक्त इतर अवयवांतून हृदयाकडे आणि हृदयाकडून परत इतर अवयवांकडे पोहोचविले जाते. काही कारणाने जर धमन्यांची क्षमता कमी झाली तर हा रक्तपुरवठा कमी होतो. पर्यायाने त्यातील पेशींना नुकसान पोहोचते आणि पेशी अकार्यक्षम होऊन रक्तपुरवठा खंडित होतो. तसेच हृदयावर विपरित परिणाम होतो.

हृदयविकाराचे प्रकार

उच्च रक्तदाब : नेहमी रक्तवाहिन्यांवर रक्ताभिसरणाची संतुलित जबाबदारी असते. काही कारणाने जर धमन्यांना रक्ताचं वहन करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत असतील किंवा जोर लावावा लागत असेल तर त्यावर येणार ताण हा रक्तदाब म्हणून मोजला जातो. रक्तदाब हा ८० ते १२० च्या दरम्याने असायला हवा. जर सलग तपासणीअंती रक्तदाब ९० ते १४० किंवा त्‍यापेक्षा जास्‍त असेल तर ती चिंतेची बाब ठरते.

हार्ट अटॅक : अचानक हृदयक्रिया थांबणे.

कॉग्निटिव्ह हार्ट फेल्युअर : हृदयाचे रक्ताभिसरण थांबणे.

अरिथमिआ : हृदयाची धडधड अचानक कमी किंवा जास्त होणे.

पेरीफेरल आर्टरी डिसीझ : हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांच्या आकार निमुळता किंवा बारीक झाल्यामुळे रक्तपुरवठा कमी होणे.

स्ट्रोक : हृदयापासून मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे स्ट्रोक येणे.

कंजेनायटल हार्ट डिसीज : जन्मतः हृदयाची वाढ कमी होणे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com