गोमन्तक डिजिटल टीम
जागतिक पर्यटन दिनानिमित्त ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा आणि स्कल इंटरनॅशनलतर्फे गोवा पर्यटन खात्याच्या सहकार्याने 27 सप्टेंबर रोजी हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यटन आणि शांतता या थीमवर आधारित या उपक्रमात गोव्याचा समृद्ध इतिहास आणि स्थानिक जीवनात खोलवर जाण्यासाठी तीन खास हेरिटेज वॉक तयार करण्यात आले आहेत.
तीन हेरिटेज वॉकपैकी एक वॉक म्युझियम ऑफ ख्रिश्चन आर्टने आयोजित केला आहे. यात जुन्या गोव्यातील मॉन्टे सँटोच्या टेकडीवर असलेल्या स्मारकांचे दर्शन घेतले जाणार आहे.
या वॉकची वेळ सकाळी 9 ते 12 अशी आहे. सहभागींनी अवर लेडी ऑफ द रोझरी चर्च, ओल्ड गोवा इथे एकत्र यायचे आहे.
दुसरा वॉक मेक इट हॅपन टीमने आयोजित केला आहे. या वॉकमध्ये सहभागींना साळगाव गावातून निसर्गरम्य वाटचाल करण्याची संधी मिळेल.
दुपारी 4:30 वाजता वॉक सुरू होईल आणि संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत संपेल. सहभागींनी माई दे डेस चर्च, साळगाव येथे एकत्र यायचे आहे.
तिसऱ्या वॉकचे नेतृत्व सोल ट्रॅव्हलिंग करणार आहे. या वॉकमध्ये सहभागींना गोव्यातील सर्वात जुन्या बाजारपेठेची अनोखी भेट घडवून आणण्यात येईल आणि स्थानिक विक्रेते, कलाकार आणि कारागीर यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
सकाळी 9 ते 11:30 पर्यंत वॉकला सुरुवात होणार असून सहभागींनी टॅक्सी स्टँड, म्हापसा येथे एकत्र यायचं आहे.