Prakash Amte: 'हेमलकसा येथे भूक काय असते याची जाणीव झाली'! डॉ. प्रकाश आमटेंची कबुली; राजभवनात साधला गोमंतकीयांशी संवाद

World Environment Day Goa: डॉ. आमटे यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, तेथील आदिवासींनी पूर्वी कधीही कपडे घातलेली माणसे पाहिली नव्हती. त्यामुळे आमचे सुरवातीला स्वागत झाले नाही.
Prakash Amte speech Goa
Prakash Amte Goa World Environment DayDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: हेमलकसा येथे सेवा करताना जगणे काय असते, भूक काय असते याची जाणीव झाली. आज मागे वळून पाहिले तर वाटते, आयुष्यात खूप काही गमावले असले तरी मन:शांती लाभली आहे. कारण इतरांच्या आयुष्यात काही बदल घडविता आला, असे प्रांजळ उद्गार सुप्रसिद्ध समाजसेवक, वैद्यकीय व्यावसायिक आणि मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आमटे यांनी काढले.

जागतिक पर्यावरण दिन २०२५ निमित्त गोवा सरकारतर्फे आयोजित राजभवन येथे विशेष कार्यक्रमात आयोजित संवाद सत्रात त्यांनी आपल्या जीवनप्रवासातील प्रेरणादायी क्षण कथन केले. यावेळी त्यांच्या सहचारिणी डॉ. मंदाकिनी आमटे देखील उपस्थित होत्या.

शाळकरी वयातच बाबांनी आम्हाला सहलीसाठी आदिवासी भागात नेले. तिथे माणसांची अवस्था पाहून मन हेलावले. त्या अनुभवाने मनामध्ये काही तरी करून दाखवायचे ठरवले ,असे डॉ. आमटे यांनी भावुक होत सांगितले. या अनुभवांनी प्रेरित होऊन त्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष हेमलकसा येथे जाऊन सेवा देण्याचा निर्णय घेतला. त्यांची पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनीही लग्नानंतर त्याच प्रवासात साथ दिली. मी तिला शब्द दिला होता आणि तिने तो पूर्ण विश्वासाने स्वीकारला. तिच्याशिवाय हे शक्य झाले नसते, असे ते नम्रपणे म्हणाले.

कपडे घातलेली माणसेही त्यांनी पाहिली नव्हती

डॉ. आमटे यांनी एक आठवण सांगितली. ते म्हणाले की, तेथील आदिवासींनी पूर्वी कधीही कपडे घातलेली माणसे पाहिली नव्हती. त्यामुळे आमचे सुरवातीला स्वागत झाले नाही. उलट, भीती आणि संशय होता. पण आम्ही माघार घेतली नाही. या संघर्षात स्थानिकांमध्ये विश्वास निर्माण केला, त्यांच्या रोगांवर उपचार केले, अंधश्रद्धा दूर केली आणि शिक्षणाची गंगा वाहिली, असे त्यांनी सांगितले.

Prakash Amte speech Goa
Goa Eco Sensitive Zone: धक्कादायक! जैव संवेदनशील गावे वगळण्यासाठी लेखी प्रस्तावच सादर नाही; केंद्र सरकारचेच स्मरणपत्र

समाजसेवेचा मूलाधार म्हणजे सहानुभूती

आमटे म्हणाले की, आम्ही मोठे काही केले असे वाटत नाही. फक्त त्यांच्या दु:खाशी एकरूप झालो, त्यांचे ऐकले आणि एक सहकारी म्हणून मदत केली. समाजसेवेचा खरा अर्थच तो आहे. सहानुभूती आणि सामर्थ्य एकत्र देणे असे विचार त्यांनी या संवादात मांडले.

Prakash Amte speech Goa
Environment Minister Siqueira: गोव्यातील जास्तीत जास्त '63 गावे' जैवसंवेदनशील! पर्यावरणमंत्री सिक्वेरा दिल्लीला जाणार

जंगलात आयुष्य शोधले

डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सांगितले की, मी एक डॉक्टर म्हणून आयुष्य सुरू केले, पण त्या जंगलात मला खरे आयुष्य सापडले. आदिवासींना केवळ औषधे नाही, तर प्रेम, सन्मान आणि आत्मविश्वास द्यायचा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com