Cyber Crime in Goa: सायबर फसवणूक; गोव्यातील अधिकाऱ्यांना संवादात्मक कार्यशाळा

सायबर क्राईम आर्थिक फसवणुकीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या गोवा पोलीस अधिकार्‍यांसाठी एक संवादात्मक कार्यशाळा
Cyber Crime in Goa
Cyber Crime in GoaDainik Gomantak

Cyber Crime in Goa: देश पातळीवर सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीच्या One97 कम्युनिकेशन्स लिमिटेड (Paytm) यांच्या सहकार्याने रायबंदर येथील सायबर गुन्हे शाखेतर्फे सायबर क्राईम आर्थिक फसवणुकीशी संबंधित कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या गोवा पोलीस अधिकार्‍यांसाठी एक संवादात्मक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

Cyber Crime in Goa
Accident Death Case: ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू! नामोशी येथील घटना

सायबर फसवणूक रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या धोरणांवर अधिकाऱ्यांंना मार्गदर्शन करणे तसेच फिन्टेक इकोसिस्टम कशी चालते याची माहिती देणे, हे कार्यशाळेचे उद्दिष्ट होते. कार्यशाळा पेटीएम मर्चंट ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष पारिजात तिवारी आणि सरव्यवस्थापक जगमोहन अग्रवाल यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली होती.

'या' मुद्यांवर आढावा....

सदर कार्यशाळेत वित्तीय तंत्रज्ञानाचा आढावा, पेमेंट फ्लो आणि चॅनेल, फसवणुकीविरूद्ध सुरक्षा, व्यवहार देखरेख तसेच फसवणूक प्रतिबंध उपाय यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश केला होता.

कार्यशाळेला सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर, पोलीस निरीक्षक विकास देयकर, पोलीस निरीक्षक विद्यानंद पवार, पोलीस उपनिरीक्षक सर्वेश सावंत आणि सोबतच इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com