मलेरिया नियंत्रणासाठी कार्य करावे: डॉ. रुफीन मोंतेरो

आरोग्य संचालनालयातर्फे जागतिक मलेरिया दिवस
make malaria free state
make malaria free stateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: पूर्वी गोव्यात तुरळक मलेरिया रुग्ण सापडायचे; मात्र 1997 नंतर ज्यावेळी गोव्यात बांधकामे वाढली त्यावेळी मलेरिया फोफावला. कालांतराने मृत्यूदर कमी झाला. मलेरिया नियंत्रणासाठी आरोग्य संचालनालयाकडून प्रशंसनीय कार्य करण्यात आले आहे; मात्र ज्या क्षेत्रात मलेरियाचे प्रमाण अधिक आहे तेथे नियंत्रणासाठी जोमाने कार्य करण्याची गरज आहे, असे मत भारतीय आरोग्य संघटनेच्या गोवा शाखेचे अध्यक्ष डॉ. रुफीन मोंतेरो यांनी व्यक्त केले.

आरोग्य संचालनालय व नॅशनल वेक्टर बोर्न कंट्रोल प्रोग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून मोंतेरो बोलत होते. ते म्हणाले, आम्ही आमच्या सभोवतालचे पर्यावरण स्वच्छ ठेवत नाही, पाणी साचू देतो, बांधकाम क्षेत्रात स्थानिक कामगार मिळत नसल्याने आम्हाला स्थलांतरीत कामगारांची गरज भासते. ज्या क्षेत्रात मलेरियाचे प्रमाण अधिक आहे तेथे अधिक जोमाने कार्य करावे, कारण आपण मलेरियावर नियंत्रण आणू शकतो. आमची युवा पिढी बुद्धीमान आहे त्यांना योग्य मार्गदर्शन प्राप्त झाल्यास ते संशोधन क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून दाखवतील असे त्यांनी सांगितले.

make malaria free state
बाणावलीच्या खास सभेत महत्त्वाच्या प्रश्‍नांवर चर्चा

डॉ. गीता काकोडकर म्हणाल्या, जरी गोव्यात मलेरिया रूग्णात घट झाली असली तरी आम्हाला अजून चांगले कार्य करायचे आहे. 2018 नंतर गोव्यात मलेरियामुळे एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही ही प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. कल्पना महात्मे म्हणाल्या, भारत सरकारने 2030 पर्यंत मलेरियामुक्त होण्याचे उद्दिष्‍ट्य ठेवले आहे. गोवा 2023 पर्यंत मलेरियामुक्त करण्याचे ध्‍येय आहे. गोव्यात ग्रामीण, शहरी व सामाजिक अशी ककूण 33 आरोग्य केंद्रे असून त्यापैकी पणजी, पर्वरी कांदोळी, चिंबल, शिवोली, मडगाव व कुडतरी या क्षेत्रात मलेरियासाठी अधिक दक्षतेची ठिकाणे आहेत.

गोव्यातील प्रमुख बांधकाम सुरू असणारी ठिकाणे, स्थलांतरीत कामगार वस्ती, पर्यटन शॅक्स, औद्योगिक समूह आणि फिशिंग जेटी ही मलेरियासाठी संवेदनशील क्षेत्रे असल्याचे प्रमाणे गोव्यातील आरोग्य संचालनालयाद्वारे मलेरिया निर्मुलनासाठी कार्य केले पाहिजे त्याच सोबतच राज्यातील पंचायत, सार्वजनिक बांधकाम खाते, माहिती आणि प्रसार खाते, कामगार उद्योग, सामाजिक संस्था यांचे सहयोग देखील महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com