Women's March: महिला सुरक्षेसाठी कठोर कायदा करा; महिला संघटनांचा एल्गार

Kolkata Doctor Case: कोलकात्यातील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील दोषीवर कडक कारवाई होईल का या बद्दलच संशय आहे; आवडा व्हिएगश
Kolkata Doctor Case: कोलकात्यातील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील दोषीवर कडक कारवाई होईल का या बद्दलच संशय आहे; आवडा व्हिएगश
Women's MarchDainik Gomantak
Published on
Updated on

Margao Women's March

सासष्टी: कोलकातामधील एका महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून केल्याच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करावा किंवा जर असेल तर त्याची कठोर अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज (गुरुवारी) मडगावात विविध महिला संघटनांतर्फे निदर्शने करून मोर्चा काढण्यात आला.

दरम्यान, सकाळी कारे कायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालय आवारात निदर्शने केली. संध्याकाळी आयएमए, इनरव्हील, मडगाव महिला मंडळ, बायलांचो एकवोट, यंग वुमन्स ख्रिस्टीयन असोसिएशन या संघटनेच्या सदस्यांनी पालिका आवारात एकत्र येऊन निदर्शने केली व मोर्चा काढला.

डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई यांनी महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू करावा, अशी मागणी केली. आवडा व्हिएगश म्हणाल्या की कोलकात्यातील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील दोषीवर कडक कारवाई होईल का? या बद्दलच संशय आहे. सर्व डॉक्टरांना तसेच रात्रपाळीत ज्या महिला काम करतात, त्या सर्वांच्या सुरक्षेसाठी सरकारने प्राधान्य द्यायला हवे. जोपर्यंत महिलांना न्याय मिळत नाही, तो पर्यंत महिलांचा संघर्ष सुरूच राहील.

Kolkata Doctor Case: कोलकात्यातील बलात्कार व खुनाच्या गुन्ह्यातील दोषीवर कडक कारवाई होईल का या बद्दलच संशय आहे; आवडा व्हिएगश
Kolkata Doctor Case: कोलकाता घटनेबाबत गोव्यात नागरिक रस्त्यावर; निषेध मोर्चा, मेणबत्ती रॅली काढून जोरदार निषेध

महिलांना पुरेसे स्वातंत्र्य नाहीच!

भारत स्वतंत्र होऊन ७८ वर्षे झाली. मात्र महिलांना पुरेसे स्वातंत्र्य अजूनही मिळालेले नाही, असे महिला मंडळाच्या अध्यक्ष रिना पाणंदीकर म्हणाल्या. कारे कायदा महाविद्यालयातील निदर्शनांत महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी कडक कायदा करण्याची मागणी करण्यात आली. ही निदर्शने आणि निषेध सभा युवकांमध्ये लिंग आधारीत हिंसा व त्या विरोधात आवाज उठविण्यासाठी युवकांमध्ये सक्रियता जागृत करण्यासाठी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com