Sanguem News : काकोडा येथे शनिवारी महिला लायन्स क्लबचे उद्‍घाटन, अध्यक्षपदी फर्नांडिस

यावेळी क्लबच्या अध्यक्षा ग्लोरिया फर्नांडिस , सचिव फ्रेगरन्स फर्नांडिस, प्रांत सचिव आश्विनकुमार कर्पे, अलिस्टन फर्नांडिस, राहुल वेरेकर आदी उपस्थित होते.
Women's Lions Club
Women's Lions ClubDainik Gomantak

Sanguem News : सांगे, काकोडे येथे महिला लायन्स क्लबचे उद्‍घाटन शनिवार ता. ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती लायन्स क्लबचे प्रांत प्रमुख जॉस ब्रिटो यांनी पत्रकार परिषद दिली.

यावेळी क्लबच्या अध्यक्षा ग्लोरिया फर्नांडिस , सचिव फ्रेगरन्स फर्नांडिस, प्रांत सचिव आश्विनकुमार कर्पे, अलिस्टन फर्नांडिस, राहुल वेरेकर आदी उपस्थित होते.

ग्लोरिया फर्नांडिस यांनी सांगितले की, महिलासाठी विविध क्षेत्रात भरीव काम करण्याची इच्छा होती.

Women's Lions Club
Goa Tiger Project: व्याघ्र प्रकल्पाबाबत सरकार ‘बॅकफूट’वर

राज्यात अनेक संस्था कार्यरत असल्या तरी महिलांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी किंवा महिलांना मानाचे स्थान देण्याकरिता महिलांचा लायन्स क्लब सुरु करावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून या क्लबची स्थापना केली.

याला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. तसेच मंत्री काब्राल यांचेही सहकार्य लाभत आहे. प्रांतपाल जॉस ब्रिटो यांनी सांगितले की, लायन्स क्लब महिलासाठी आरोग्य,

सामाजिक बांधिलकी बरोबर पर्यावरण रक्षण, अत्याचार विरुद्ध प्रशिक्षण देते. आता महिलांनी पुढाकार घेऊन लायन्स क्लबची स्थापना केली आहे, त्यासाठी संपूर्ण सहकार्य असल्याचे स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com