Women Umpire : ऐतिहासिक घटना; रणजी स्पर्धेत आता महिलांची ‘पंच’गिरी

पर्वरीत गोवा-पुदुचेरी क्रिकेट सामन्यासाठी वृंदा राठी पंच
 Women Umpire Rathi in Goa
Women Umpire Rathi in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

किशोर पेटकर

Women Umpire Rathi in Goa: मुंबईतील वृंदा राठी यांच्यासाठी मंगळवारची (ता. 10) सकाळ ऐतिहासिक असेल. गोवा आणि पुदुचेरी यांच्यातील रणजी करंडक क्रिकेट सामन्यासाठी त्या पर्वरी येथील मैदानावर पंचाच्या गणवेषात उतरतील, तेव्हा महत्त्वाच्या घटनेची नोंद होईल. स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच महिला मैदानावर निर्णय देताना दिसेल.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) 2022-23 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबईची वृंदा, चेन्नईची जननी नारायणन व दिल्लीची गायत्री वेणुगोपालन यांची ऑनफिल्ड पंच म्हणून नियुक्ती केली आहे.

मंगळवारपासून रणजी स्पर्धेची पाचवी फेरी सुरू होत असून तिघीही सहकारी पुरुष पंचांसमवेत मैदानावर पंचगिरीसाठी उतरतील. या तिघींत वृंदा सर्वांत युवा असून 33 वर्षांच्या आहेत, तर जननी 37, तर गायत्री 43 वर्षीय आहेत. गोवा व पुदुचेरी यांच्यातील लढती वृंदा यांच्या साथीत अनुभवी पंच विनीत कुलकर्णी पंचगिरी करतील.

गोव्यात दुसऱ्यांदा : 2019 मध्ये पर्वरी येथेच गोवा व केरळ यांच्यातील 16 वर्षांखालील मुलांच्या विजय मर्चंट क्रिकेट सामन्यात वृंदा राठी व जननी नारायणन यांनी एकत्रित पंचगिरी केली होती. तेव्हा राजस्थानच्या मीनाक्षी मंगला या सामनाधिकारी होत्या.

आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांतही काम

वृंदा व जननी यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2020 मध्ये पंचांच्या आयसीसी पॅनेलमध्ये समावेश केला. वृंदा यांनी आतापर्यंत महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 19 सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले आहे.

जननी यांनी महिलांच्या दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांसह 14 टी-20 सामन्यांत तर गायत्री यांनी 13 टी-20 सामन्यांत पंचगिरी केली आहे. 9 ते 20 डिसेंबर 2022 या कालावधीत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियम व ब्रेबॉर्नमधील स्टेडियमवर झालेल्या भारत व ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या टी-20 मालिकेत वृंदा, जननी व गायत्री यांनी ऑनफिल्ड पंचगिरी केली होती.

यापूर्वी पुरुषांच्या वयोगटात सहभाग : वृंदा व जननी यांनी एकत्रितपणे कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात पंचगिरी केली आहे. पण रणजी करंडक स्पर्धेत पंचगिरी करण्याची त्यांची ही पहिलीच वेळ आहे. वृंदा यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये मणिपूर व मिझोराम यांच्यातील 23 वर्षांखालील पुरुष गटातील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात सर्वप्रथम पंचगिरी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com