10 दिवस मृत्यूशी झुंज अपयशी; पणतीत चुकून ओतले पेट्रोल, आगीत जखमी महिलेचा अखेर मृत्यू

हळदोणे गावात शोककळा
Diya
DiyaDainik Gomantak
Published on
Updated on

Aldona, Goa: हळदोणेतील रामतळे येथे नगरप्रदक्षिणा पालखीच्या स्वागतासाठी आपल्या घराबाहेर पणत्या पेटवत असताना अचानक भडका उडून आगीत गंभीरपणे होरपळलेल्या 32 वर्षीय विवाहितेचा गुरुवारी सकाळी गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मागील दहा दिवसांपासून तिची मृत्यूशी चाललेली झुंज अखेर अपयशी ठरली. तिच्या जाण्याने हळदोणे गावात शोककळा पसरली.

उपलब्ध माहितीनुसार, ही दुर्घटना दि. १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९च्या सुमारास घडली होती. घटनेच्या दिवशी दिक्षिता या घराबाहेर पालखीच्या स्वागतासाठी पणत्या पेटवत होत्या. तेव्हा त्यांनी पणत्यांमध्ये तेलाऐवजी चुकून पेट्रोल ओतले. खरेतर ही पेट्रोलची बॉटल घरी आणून ठेवली होती. त्यावेळी दिक्षिता यांनी ते तेल समजून पणत्यांमध्ये ओतण्यास सुरवात केली.

यावेळी पेट्रोलचा भडका झाला आणि त्यांच्या हातात असलेली पेट्रोलची बॉटल अंगावर उसळली. यात त्या गंभीररित्या जखमी झाल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com