Goa News: महिलांना प्रेरणादायी पिंक रिक्षा

Goa News: स्वावलंबनाचा ध्यास : रोटरी क्लबचा उपक्रम, ईडीसीकडून कर्ज
women pink rickshaw Rotary Club initiative panaji
women pink rickshaw Rotary Club initiative panaji Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: राज्यातील महिलांना स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या पिंक रिक्षा महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. रोटरी क्लबकडून घेतलेल्या पुढकारांतर्गत या पिंक रिक्षा सुरू झाल्या होत्या. सेवेत रुजू झाल्यापासून महिलांना रिक्षा चालवताना पाहून इतर युवती आणि महिला प्रोत्साहित होत असून त्या आता स्वावलंबी होण्यासाठी पुढे येत आहेत.

15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून या रिक्षा लाभार्थींना प्रदान करण्यात आला होत्या. रिक्षा खरेदीसाठी आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) तीन टक्के व्याज दरावर कर्ज देण्याची सुविधा केली आहे. अनुसूचित जाती व जमातीसाठी व्याज दर दोन टक्के ठेवला आहे. एकूण 10 लाभार्थींना रिक्षा देण्यात आल्या.

women pink rickshaw Rotary Club initiative panaji
Food Poisoning Death: मडकई येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे बेळगावच्या तरुणाचा मृत्यू...

ई-वाहन अनुदान निधी योजना सुरूच

गोवा सरकारने मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीसाठी तीन टक्के दराने कर्ज दिले आहे. कर्जाचा हप्ता सुरू होण्यापूर्वी लाभार्थ्यांना व्यवसायात स्थिर होण्यासाठी मदत व्हावी यासाठी पहिले तीन महिने हप्ते घेतले जाणार नाहीत.

सरकारने ई-वाहन अनुदान निधी योजना 31 जुलै रोजी बंद केली होती; परंतु फक्त पिंक रिक्षासाठी ही योजना सुरू ठेवण्याची आणि अनुदान निधी 10 टक्क्यांवरून 25 टक्के वाढवण्याची मागणी रोटरीने सरकारकडे केली होती. सरकारने ती मान्य करून 29 ऑगस्ट 2022 रोजी कायद्यात दुरुस्ती करून अधिसूचित केली आहे.

पिंक रिक्षा उपक्रमात भाग होण्याची इच्छा होती; परंतु सुरवातीला काही अडचणी आल्यानंतर अखेर हे करून दाखवायचेच असा निश्‍चय केला. आज रिक्षा चालवायला सुरू केल्यानंतर नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून स्थानिक पायलट, रिक्षा आणि टॅक्सीचालक यांच्याकडून मदत होत आहे. एखादी महिला किंवा युवती असल्यास ते भाडे मला दिले जाते. महिलांनी स्वावलंबी होण्याची ही सुरवात आहे.

- रेश्‍मा हळदोणकर, हळदोणे, पिंक रिक्षा लाभार्थी

महिलांना स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने पिंक रिक्षा उपक्रम रोटरी क्लबकडून सुरू करण्यात आला होता. प्रथम दहा लाभार्थींना रिक्षा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय आणखी सात रिक्षा वाटेवर आहेत. रोटरी क्लबद्वारे राज्यात अनेक उपक्रम राबविले आहेत; परंतु पिंक रिक्षासारखा उपक्रम पहिल्यांदाच येथे झाला आहे. विविध संघटना आणि महिला मंडळांद्वारे उपक्रमांसंदर्भात जागृती करण्यात आली होती.

- सचिन मेणसे, पिंक रिक्षा उपक्रम प्रमुख, रोटरी क्लब

women pink rickshaw Rotary Club initiative panaji
Goa News: भक्ती कुलकर्णीची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

पिंक रिक्षा उपक्रमाबद्दल जेव्हा माहिती मिळाली, तेव्हा यात सहभागी व्हायचे असा दृढ संकल्प केला होता. रोटरी क्लबने डेमो रिक्षा आणली होती, ती एकदा चालविल्यानंतर आपल्याला हे जमणार असल्याचा विश्वास आला. स्वतः प्रशिक्षण घेऊन इतर महिलांना प्रोत्साहित करून त्यांना प्रशिक्षण दिले. अजूनही काही महिलांच्या मनात पिंक रिक्षाबद्दल भीती आहे. परंतु लवकरच ॲप आल्यानंतर आणखी ग्राहक मिळतील.-प्रीती केरकर, म्हापसा, पिंक रिक्षा लाभार्थी

पिंक रिक्षा लाभार्थी

  •   रेश्‍मा हळदणकर

  •   शिल्पा सावंत

  •   प्रीती केरकर

  •   शिल्पा वांतेकर

  •   नंदा जाबोळकर

  •   सुलोचना नाईक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com