
Colvale Jail Women Operated Petrol Pump
म्हापसा: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाच्या शिरपेचात मानाचा तुरा जोडला जाणार आहे. लवकरच कारागृह विभाग या कारागृहाबाहेर पेट्रोलपंपची सेवा कार्यान्वित करणार आहे. तुरुंग महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई यांनी गोवा मुक्तिदिनाच्या औचित्याने गुरुवारी जाहीर केले की, कारागृहाच्या बाहेर एक पेट्रोलपंप चालवण्याचा आमचा मानस आहे. ज्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशन त्यावर काम करत असून हा पेट्रोलपंप पूर्णपणे महिला चालवतील.
कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी यांच्या सुदृढतेसाठी साकारलेल्या व्यायामशाळेचा शुभारंभ ओमवीर सिंग यांच्या हस्ते करण्यात आला. ही व्यायामशाळा क्रीडा-युवा व्यवहार संचालक निधीतून साकारली आहे. त्यामुळे कारागृहाच्या आवारात सुरू केलेल्या व्यायामशाळेत २५० कर्मचाऱ्यांना मोफत व्यायाम करण्यास मिळणार आहे.
ही व्यायामशाळा उभारण्यासाठी मुख्यमंत्री, क्रीडा आणि युवा व्यवहार संचालक तसेच तुरुंग महानिरीक्षकांनी पुढाकार घेतल्याने त्यांचे आम्ही आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया तुरुंग अधीक्षक शंकर गावकर यांनी दिली. यावेळी साहाय्यक अधीक्षक भानुदास पेडणेकर तसेच उपअधीक्षक अनिल गावकर आदी उपस्थित होते.
कारागृहात मसाला बनविणाऱ्या युनिटचे उद्घाटन तुरुंग महानिरीक्षकांच्या हस्ते झाले. हा मसाला सध्या कारागृहातील स्वयंपाकगृहात वापरला जाईल. कालांतराने हा मसाला प्रशासकीय कँटिन्स तसेच इतरत्र पुरवठा करण्याचा मानस आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अभ्यागत मंडळाच्या शिफारीनुसार पन्नास महिला कैद्यांसाठी स्वतंत्र स्वयंपाकगृह तयार केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.