Khandola News : महिलांच्या योगदानामुळेच सर्वांगीण विकास शक्‍य! गोविंद गावडे

Khandola News : खांडोळा येेथे मिरवणुकीला मोठा प्रतिसाद
Khandola
Khandola Dainik Gomantak

Khandola News :

खांडोळा, ग्रामपातळीपासून देशपातळीवर सर्व क्षेत्रात महिलांच्या बहुमोल योगदानामुळेच सर्वांगीण विकास होत आहे. महिलांच्या त्यागाचा, कर्तृत्वाचा सन्मान केला पाहिजे. महिलावर्ग पुरुषांपेक्षा नेहमीच दुप्पट काम करतात, असे मत मंत्री गोविंद गावडे यांनी खाडोळ्यातील ‘नारी शक्ती वंदन’ कार्यक्रमप्रसंगी व्यक्त केले.

यावेळी सरपंच विशांत नाईक, जयेश नाईक, पंच दिलीप नाईक, शिवराम नाईक, जिल्हा पंचायत सदस्य श्रमेश भोसले, हर्षा गावडे, रीना गावडे, विनायक वेंगुर्लेकर, शोभा पेरणी, अनिशा गावडे व्यासपीठावर उपस्थित होत्या.

Khandola
Goa Congress: दक्षिण गोव्‍यात काँग्रेसने कॅथोलिक उमेदवारच उभा करण्‍यासाठी दबाव

गावडे पुढे म्हणाले, भाजप सरकार ग्रामविकासासाठी विविध योजना राबवीत आहे. विश्‍वकर्मा योजनेनुसार पारंपरिक कलांचे संवर्धन होईल, त्यातून कलाकारांना काम मिळेल. तसेच महिलांचे योग्य प्रकारे सबलीकरण करण्यासाठीही विविध योजना आहेत. त्याचा लाभ महिलांना घ्यावा. अनिशा गावडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रनिती सावंत यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com