Delhi Goa Flight: दिल्ली - गोवा विमानात महिलेचा अजब कारनामा, थेट गुन्हाच दाखल

घटनेने विमानात खळबळ माजली आणि विमानात प्रवाशांची धावपळ झाली.
Delhi Goa Flight
Delhi Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Delhi Goa Flight: दिल्लीतून गोव्याला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये नेहमीप्रमाणे शांतता होती. काही प्रवासी पुस्तक वाचत होते तर काहीजण मोबाईलमध्ये गुंतले होते. काहीजण शेजारी बसलेल्या प्रवाशांशी संवाद साधत होते तर काही त्यांच्या मुलांशी बोलण्यात व्यस्त होते.

त्याचवेळी एका घटनेने विमानात खळबळ माजली आणि विमानात प्रवाशांची धावपळ झाली. याप्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरले.

तर झाले असे की, विमानात सर्वकाही नॉर्मल असताना एक महिला हातात कुत्रा घेऊन आली. अचानक तिच्या हातातून कुत्रा सुटला आणि तो मिळेल त्या दिशेला भूंकत धावत सुटला. यामुळे प्रवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली तसेच, अनेक प्रवाशांची देखील धावपळ झाली.

विमानात असलेली लहान मुलं रडत- रडत ओरडू लागली. कसेबसे परिस्थिती नियंत्रणात आली. पण, याप्रकरणी महिलेवर लोकांचा जीव धोक्यात घालल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलिशा अधना असे या महिलेचे नाव आहे.

गुन्हा दाखल झालेली महिला दिल्लीची रहिवासी असून, ती गोव्याला जात होती. महिला तिचा पाळीव कुत्राही फ्लाइटमध्ये घेऊन आली होती. कुत्र्याला पिंजऱ्यात बंद होता. मात्र, अस्वस्थ झाल्याने तो विचित्र पद्धतीने ओरडायला लागला म्हणून त्याला बाहेर काढण्यात आले.

Delhi Goa Flight
इस्लामिक कार्यशाळेत शालेय मुलींना हिजाब घालण्यास भाग पाडले, हिंदू परिषद म्हणते ते दाबोळीतील 'स्कूल जिहाद' प्रकरण काय?

महिला कुत्र्यासोबत फ्लाइटमध्ये आली आणि फ्लाइटमध्ये आल्यानंतर तो भुंकायला लागला यामुळे प्रवासी घाबरले. अशा पद्धतीने कुत्रा विमानात आणल्याने अनेकांनी महिलेला विरोध केला. फ्लाइट अटेंडंट्सनी कसेतरी हे प्रकरण हाताळले.

दरम्यान, गोव्यात पोहोचल्यानंतर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय दंड संहितेच्या कलम 336 अंतर्गत 30 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती मोपा पोलिसांनी दिली आहे. चौकशीसाठी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महिला आणि कुटुंबातील एक सदस्य दिल्लीच्या फ्लाइटमध्ये चढले. विमानाने उड्डाण केल्यानंतर, कुत्रा भुंकायला लागला. विमानात कुत्रा पाहून लोक घाबरले आणि प्रवाशांनी आकासा एअरच्या क्रू मेंबर्सकडे तक्रार केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com