दूधसागर धबधब्यावर 11 महिन्यांच्या मुलीसह आईला जीवदान, दसरा सुट्टीच्या काळात गोव्यात दृष्टीची 27 रेस्क्यू ऑपरेशन

दूधसागर धबधब्यावर, कोलकाता येथील मायलेक खडकावर घसरल्याने खाली पडल्या
Dudhsagar Falls
Dudhsagar FallsDainik Gomantak
Published on
Updated on

दसऱ्यामुळे जोडून आलेल्या सुट्टयांच्या काळात दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी गोवा राज्य किनारपट्टीवर राबवलेल्या बचाव कार्यात 27 जणांना जीवदान देण्यात आले. यात दूधसागर धबधब्यावर बुडणाऱ्या 11 महिन्यांच्या मुलीसह आईला जीवदान देण्यात आले तर मांद्रे समुद्रकिनारी एका रशियन महिलेला आणि पाळोळे येथे एका कयाकरला वाचवण्यात आले.

दूधसागर धबधब्यावर, कोलकाता येथील मायलेक खडकावर घसरल्याने खाली पडल्या, दोघांना जीवरक्षकांनी रेस्क्यू केले.

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर एका 55 वर्षीय रशियन महिलेला समुद्राच्या खोल भागात तीव्र प्रवाहाने खेचल्यानंतर वाचवण्यात आले. दृष्टी सागरी जीवरक्षक सखाराम बांदेकर यांनी सर्फबोर्डच्या सहाय्याने पीडितेला वाचवून तिला सुरक्षित पुन्हा किनाऱ्यावर आणले.

तसेच, गोव्यातील दोन 29 वर्षीय पुरुषांना मांद्रे समुद्रात बुडण्यापासून वाचवण्यात आले, दोघे लाटेत अडकल्यानंतर लाइफसेव्हर्स नागेश बर्गे आणि नूतन मोटे यांनी पाण्यात धाव घेतली आणि रेस्क्यू ट्यूब आणि जेटस्कीच्या मदतीने दोघांना पुन्हा किना-यावर आणले.

तसेच, दुसऱ्या एका घटनेत शिवोली येथील 28 वर्षीय व्यक्तीला मांद्रे समुद्रकिनारी वाचवण्यात आले.

कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर 42 आणि 52 वर्षे वयोगटातील दोन स्थानिक पुरुषांना जीवदान देण्यात आले, दुर्गा विसर्जन करताना दोघेही पाण्यात बुडण्याच्या स्थितीत होते. दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या जीवरक्षकांनी दोघांचीही सुटका केली.

याशिवाय कळंगुट येथे कर्नाटकातील तिघांना, हरमल येथे बेंगळुरू येथील महिलेला आणि एका महाराष्ट्रीयन व्यक्तीला वाचवण्यात आले. तसेच, बागा, आगोंद समुद्रकिनाऱ्यावर दोघांना जीवदान देण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com