हणजुण-कायसुव पंचायतकडून किनाऱ्याची साफसफाई सुरू

सरकारी मदतीची वाट न पाहाता हणजुण- कायसुव पंचायतकडून किनाऱ्याची तात्काळ साफसफाई सुरू केली आहे.
किनाऱ्यावर साचलेले तेल तवंगाचे गोळे हटवतांना हणजुण-कायसुव पंचायतीचे सरपंच सावियो आल्मेदा व इतर पंचायत मंडळ
किनाऱ्यावर साचलेले तेल तवंगाचे गोळे हटवतांना हणजुण-कायसुव पंचायतीचे सरपंच सावियो आल्मेदा व इतर पंचायत मंडळ संतोष गोवेकर

शिवोली: बार्देशातील हणजुण तसेच वागातोर येथील समुद्र किनार्यावर  तेल तवंगाचे गोळे साचल्याने किनारा पुर्णपणे काळवंडून गेला होता त्यामुळे पर्यटक तसेच स्थानिक लोकांनी गेले दोन दिवस याभागात येणे टाळले होते, मात्र याबाबतीत सरकारच्या मदतीची वाट न पाहाता स्थानिक पंचायत मंडळाने सरपंच सावियो आल्मेदा यांच्या पुढाकाराने येथील किनार्याची साफसफाई (Cleaning) केली व किनारा पर्यटकांसाठी (Tourists) पुर्ववत खुला केला. पंचायत मंडळाने याकामात घेतलेल्या पुढाकाराबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केले असून  इतरांसाठी एक चांगले उदाहरण असल्याचे स्थानिक सुभाष नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, हणजुण कायसुव पंचायत मंडळाला याआधीच सरकारचा ग्राम स्वच्छता पुरस्कार लाभलेला आहे. दरम्यान,  याभागातील निसर्गरम्य अशा  हणजुण -वागातोर किनार्याकडे दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी विदेशी पर्यटक भेट देत असतात त्यामुळे याभागातील छोटे मोठे व्यापारी, स्थानिक चहा टपरीवाले, शहाळी विक्रेते, हॉटेलवाले  तसेच  शेक मालक आपापला धंदा व्यवसाय तेजीत चालवतात मात्र गेली सतत दोन वर्षे कोवीड महामारीच्या पाश्वभुमीवर राज्यात लागुं करण्यात आलेली टाळेबंदी आणी त्यानंतर आजपर्यत चाललेला कर्फ्यु यामुळे याभागातील छोट्या मोठ्या व्याप्यार्यांचे कंबरडे मोडून गेलेले आहे. दुर्दैवाने यंदाचा पर्यटन मौसम सुरु व्हायच्या तोंडावरच  उत्तर गोव्यातील हणजुण -वागातोर तसेच अन्य  किनारी भागात गेले दोन दिवस तेल तवंगाचे गोळे आढळून आल्यामुळे  पर्यटकांनी किनारी भागात येणे गेले दोन दिवस बंदच  केले होते.

किनाऱ्यावर साचलेले तेल तवंगाचे गोळे हटवतांना हणजुण-कायसुव पंचायतीचे सरपंच सावियो आल्मेदा व इतर पंचायत मंडळ
Goa Elections: देवेंद्र फडणवीसांचा 20 तारखेला गोवा दौरा

दरम्यान, या  प्रकारामुळे  स्थानिक व्यापारी तसेच परिसरातील व्यापार्यांची गेले दोन ते तीन दिवस झालेली आर्थिक नुकसानी लक्षात घेत स्थानिक पंचायतीचे सरपंच सावियो आल्मेदा व इतरांनी सरकारी मदतिची अपेक्षा न करता स्वता : पुढाकार घेत गुरुवारी दिवसभर राबून याभागातील किनार्याची सरतेशेवटी साफसफाई केली व येथील किनारा देशी विदेशी पर्यटकांसाठी पुर्ववत खुला केला. याकामात पुढाकार घेतल्याबद्दल  सरपंच सावियो आल्मेदा व इतर पंचायत मंडळाचे स्थानिक ग्रांमस्थ तसेच  व्यापारी वर्गाकडून कौतुक करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com