Dabolim : उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने दाबोळी चोरी प्रकरणातील आरोपींना अटक, 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

राजू गुप्ता यांच्या निवास्थानी 15 जानेवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी रोख रक्वम आणि दागिने लंपास केले होते.
Theft
TheftDainik Gomantak

नवीन वर्षात दाबोळी जयरामनगर येथील राजू गुप्ता यांच्या निवासस्थानी रोख व दागिने मिळून लाखो रुपयांची चोरी झाली होती. या चोरी प्रकरणी वास्को पोलिसात तक्रार दाखल करताच, पोलिसांनी शोध कार्य सुरु ठेवले होते.

अखेर बैज्जोई संभल येथे उत्तर प्रदेश पोलिसांनी कुख्यात चोरट्यांना चोरी प्रकरणी ताब्यात घेताच, त्याच्या कडून गोव्यात चोरी करण्यात आल्याचे उघड झाले.

वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक रोहन नागेशकर व त्याच्या सहकाऱ्यांनी उत्तर प्रदेशला जाऊन वरील चोरट्यांची ओळख पटवून त्याच्याकडून रोख व दागिने मिळून 12 लाख रुपयांचा माल ताब्यात घेऊन चार आरोपीना अटक करून गोव्यात आणले.

दाबोळी जयरामनगर येथील राजू गुप्ता यांच्या निवास्थानी 15 जानेवारी 23 रोजी अज्ञात चोरट्यांनी रोख रक्वम व दागिने लंपास केले होते. या चोरी प्रकरणी गुप्ता यांने वास्को पोलिस स्थानकांत रितसर तक्रार दाखल केली होती.

वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांना उत्तर प्रदेश बैज्जोई येथे काही चोरट्यांनी दागिने व रोख गोव्यात दाबोळीत चोरल्याची माहीती प्राप्त झाली. त्यांनी त्वरीत वास्को पोलिस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या नेतृत्वाखाली हवालदार संतोष भाटकर, दामोदर मयेकर, रोहन बिट्ये व इतरांनी उत्तर प्रदेशला जाऊन चोरट्यांची ओळख पटवून त्याच्याकडून दागिने - रोख रक्कम ताब्यात घेतली.

Theft
Mopa Airport: मोपावरून येणाऱ्या प्रवाशांना दिलासा, एसी बसच्या भाडे दरात मोठी कपात; असे आहेत नवे दर

दाबोळी येथील राजू गुप्ता यांच्या निवास्थानी दागिने व रोख चोरणारी टोळी उत्तर प्रदेश मध्ये अनेक मोठ्या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती पोलिस निरीक्षक नायक यांनी सांगितले. चोरी प्रकरणी अटक केलेले मुळ उत्तर प्रदेश येथील जितेंद्र नेताराम बेडीया(30 ), विजय मोहनलाल(20), उमेश मोहनलाल(20), रोहीत देवसिंग(19) यांना वास्को पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रोहन नागेशकर करीत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com