Panaji News : विरियातो यांच्या विधानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांचा अपमान - तानावडे

Panaji News : ...तर कॅप्टन पोर्तुगालला का गेले नाहीत : सदानंद तानावडे
Panaji
PanajiDainik Gomantak

Panaji News :

पणजी, राज्यघटनेवर विश्वास नसलेले कॉंग्रेसचे दक्षिण गोव्यातील उमेदवार विरियातो फर्नांडिस हे १९६१ मध्येच पोर्तुगालला निघून का गेले नाहीत, अशी खोचक विचारणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्नावर केली.

विरियातो यांच्या विधानामुळे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा अपमान झाल्याचा आरोप त्यांनी केला. विरियातो यांच्या म्हणण्याशी कॉंग्रेसेचे नेते राहुल गांधी हे सहमत आहेत का, अशी जाहीर विचारणाही तानावडे यांनी केली.

भाजपच्या येथील कार्यालयात त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर उपस्थित होते. पत्रकार परिषदेच्या सुरवातीला विरियातो यांच्या वक्तव्याची चित्रफीत पत्रकारांना दाखवण्यात आली. तुम्हाला वाटत नाही का विरियातो आक्षेपार्ह बोलले आहेत, अशी विचारणाही तानावडे यांनी पत्रकारांना

वरून विरियातो यांनी स्थानिकांशी संवाद साधला आणि त्यांचा विरोध मावळला. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता विरियातो यांनीच त्या बेटावर ध्वजारोहण केले होते, हे तानावडे यांनी समजून घ्यावे.

एखादी बाब अंगलट येऊ लागली की, जनतेचे लक्ष विचलीत करायचे, ही भाजपची जुनी सवय आहे. त्यांना वाढलेली महागाई, गैरप्रकार, गुन्हेगारी, बेरोजगारी, म्हादई, ड्रग्स, वेश्या व्यवसाय, जुगार, पर्यावरणाची हानी आदींवर बोलायला नको आहे. यासाठी नसलेले मुद्दे ते पुढे आणत आहेत.

तानावडे यांना आज स्वातंत्र्यसैनिकांची आठवण आली ते बरे झाले, असा टोला लगावून स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष स्व. पांडुरंग कुंकळ्येंकर यांची एक चित्रफीत पाटकर यांनी पत्रकारांना दाखवली.

त्या चित्रफितीत कुंकळ्येंकर यांनी राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी स्वातंत्र्यसैनिकांना निमंत्रण नसल्याची माहिती दिली होती. त्याकडे अंगुलीनिर्देश करून पाटकर यांनी भाजपला स्वातंत्र्यसैनिकांचा किती कळवळा आहे, हे यातून दिसले आहे.

‘लाव रे तो व्हिडिओ...’

यावेळी पाटकर यांनी तानावडे यांना आता देशप्रेमाचे भरते आले आहे, तरी त्यांनी देशाचा ध्वज हातात उलटा पकडला होता, असे सांगत ते छायाचित्रही दाखवले. त्यांनी त्याही पुढे जात जपान दौऱ्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रगीत सुरू असताना चालत राहिले, तसेच कर्नाटकच्या राज्यपालांनीही असेच केले होते. शिवाय गृहमंत्री अमित शहा ध्वजारोहण करताना तिरंगा खाली पाडतात, अशा चित्रफिती त्यांनी दाखवल्या.

चर्चेला येण्याची पात्रताच नाही!

विरियातो यांनी चर्चेचे आव्हान दिले आहे, याकडे तानावडे यांचे लक्ष वेधल्यावर ते म्हणाले, देशाच्या राज्यघटनेवर विश्वास नसलेल्या आणि निवडणूक लढविण्याची लायकी नसलेल्या व्यक्तीसोबत कसली चर्चा करायची? विरियातो यांच्याशी मीच कशाला, भाजपचा सर्वसामान्‍य कार्यकर्ताही चर्चा करू शकेल; पण त्यांची चर्चेला येण्याची लायकीच नाही.

Panaji
Goa Murder Case: अल्पवयीन मुलगी, वृद्ध महिला आणि दोन परप्रांतीय कामगार; गोव्यात 10 दिवसांत चार खून

...अन् पाटकरांनी थेट उत्तर देणे टाळले

विरियातो यांनी राज्यघटना लादली, या विधानाशी कॉंग्रेस किंवा आपण सहमत आहात का, या प्रश्नावर पाटकर यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. ते म्हणाले, या विषयावर विरियातो यांनी आपले म्हणणे मांडले आहे. दुहेरी नागरिकत्व गोमंतकीयांना का हवे यावर ते बोलत होते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी चर्चेचे आव्हान दिले आहे, ते भाजपने स्वीकारावे, असे पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com