भाजपकडून तिकीट न मिळाल्यास उत्पल पर्रीकर पणजीतून अपक्ष लढणार?

राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे सुपुत्र उत्पर पर्रीकर यांना तिकीट मिळणार का?
Utpal Parrikar
Utpal ParrikarDainik Gomantak

आगामी काळात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत आहेत. यामध्ये गोवा राज्याचाही समावेश आहे. गोव्यात सर्वच राजकीय पक्षांनी निवडणूकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडू लागले आहेत. याच पाश्वभूमीवर कॉंग्रेसह अन्य राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची याद्याही जाहीर केल्या आहेत. मात्र राज्यामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपने अद्याप आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. यातच मागील काही दिवसांपासून पणजी मतदारसंघातून कुणाचा पत्ता कट होणार, कुणाला तिकीट मिळणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे सुपुत्र उत्पर पर्रीकर यांना तिकीट मिळणार का?

यूपीसोबतच आता गोव्यातही निवडणुकीचा प्रचार तीव्र झाला आहे. खरं तर माजी संरक्षणमंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्या मुलाने बंडखोर वृत्ती दाखवायला सुरुवात केली आहे. उत्पल पर्रीकर यांनी गोव्याची राजधानी पणजीतून विधानसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. एवढेच नाही तर भाजपने उत्पल यांना तिकीट न दिल्यास ते अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतात, असंही त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत आहे.

Utpal Parrikar
गोव्यात शिवसेनेचा एक ला चलो रे! काँग्रेसचा आघाडीला नकार

दरम्यान, उत्पल यांनी त्यांचे वडील मनोहर पर्रीकर यांची जागा असलेल्या पणजीमध्ये घरोघरी जावून प्रचारही सुरु केला आहे. 2019 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर भाजपने या जागेवरुन सिद्धार्थ श्रीपाद कुंकळ्ळीकर यांना तिकीट दिले होते.

तथापि, 2019 मध्ये बाबूश यांच्यासह 10 काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर बाबूश यांची पत्नी जेनिफर यांना सरकारमध्ये महसूल हे महत्त्वाचे खाते देण्यात आले. बाबूश ही जागा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे सांगण्यात येत आहे, तर उत्पल यांना इथूनच निवडणूक लढवायची आहे.

शिवाय, मात्र ही जागा बाबूश यांच्याकडून काढून उत्पल यांना दिल्यास पक्षाला अडचणीचा सामना करावा लागेल अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. खरं तर बाबूश हे पणजीचे आमदार आहेत. त्यांच्या पत्नी तळेगावच्या आमदार आहेत. त्यांचा मुलगा पणजीचा महापौर आहे. एवढंच नाही तर बाबूशांचा प्रभाव आजूबाजूच्या 5-6 विधानसभा जागांवर आहे. शिवाय, उत्पल यांनी यावेळी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. त्याचवेळी, भाजपचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही उत्पल यांच्या संभाव्य उमेदवारीवर म्हटले आहे की, "ते एका नेत्याचे पुत्र आहेत म्हणून पक्ष तिकीट देऊ शकत नाही."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com