Lost From Kota: 'आता 5 वर्षांनी येईन', नीटचा पेपर खराब गेला अन् विद्यार्थी कोटातून बेपत्ता झाला, 24 दिवसांनी गोव्यात सापडला

Lost From Kota: बेपत्ता राजेंद्र रेल्वे स्थानकावरच झोपून रात्र काढत होता, अशी माहिती समोर आली आहे.
Student Lost From Kota Found In Goa
Student Lost From Kota Found In Goa

Student Lost From Kota Found In Goa

वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (नीट) तयारी करण्यासाठी गंगापूर शहरातून कोटा येथे आलेला विद्यार्थी 06 मे रोजी अचानक बेपत्ता झाला. तब्बल २४ दिवसांनी हा विद्यार्थी गोव्यातील मडगाव येथे सापडला. विद्यार्थ्यांच्या शोधात पोलिसांनी अनेक राज्यांत तपास केल्याची माहिती समोर आली आहे.

बेपत्ता झालेला विद्यार्थी सर्वप्रथम पुण्याला गेला, त्यानंतर तो जम्मूतील वैष्णोदेवी येथे गेला आणि अखेरीस तो गोव्यात पोहोचला. NEET UG चा पेपर खराब गेल्याने विद्यार्थी बेपत्ता झाल्याचे, विज्ञान नगर पोलिस ठाण्याचे अधिकारी सतीशचंद्र चौधरी यांनी एका वृत्तवाहिनीला माहिती दिली आहे.

राजेंद्र जगदीश मीणा (19, बामनवास, गंगापूर) असे बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. राजेंद्रने वडील जगदीश यांच्या मोबाईलवर एक संदेश पाठवला. यात "मी घर सोडून जातोय, मला पुढचे शिक्षण घेण्याची इच्छा नाही. आता पाच वर्षानंतरच मी घरी येईन, माझ्याकडे सर्वांचे नंबर आहेत, गरज पडल्यास फोन करेन. वर्षातून किमान एकदा नक्की फोन करेन," असा संदेश राजेंद्रने पाठवला होता.

Student Lost From Kota Found In Goa
Goa: विनाहात पायाचे मूल जन्माला येईल, 15 वर्षापूर्वी डॉक्टर म्हणाले होते पुन्हा विचार करा; पण मुलाने चमत्कार केला

या संदेशानंतर त्याच्या घरातील सर्वजण चिंतेत पडले आणि त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी शोधकार्य सुरु केले असता, मुलगा गोव्यात सापडला.

राजेंद्रने मोबाईल विकला आणि त्यातून मिळालेल्या पैशातून तो इकडे तिकडे फिरत होता. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याला ओळखले. मडगावच्या स्थानकावर तो आढळून आला. राजेंद्र रेल्वे स्थानकावरच झोपून रात्र काढत होता, अशी माहिती समोर आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com