Sattari News : सत्तरीत रोजगार उपलब्ध करणार : विश्‍वजीत राणे

Sattari News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तरीचा कायापालट होत आहे. त्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडणूक द्या, असे आवाहन मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
Sattari
Sattari Dainik Gomatnak

Sattari News :

वाळपई, सत्तरीचा सर्वांगिण विकास करताना येथील जीवनमान उंचावण्याचा देखील आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी रोजगार आवश्यक आहे. यामुळे येथील ग्रामीण भागात रोजगाराची साधने कशी उपलब्ध करता येईल, यासाठीही आमचा प्रयत्न सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तरीचा कायापालट होत आहे. त्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला भरघोस मतांनी निवडणूक द्या, असे आवाहन मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.

कोपार्डे, सत्तरी येथे आयोजित कोपरा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पर्ये आमदार डॉ. दिव्या राणे, केरीच्या जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, विनोद शिंदे, सरपंच सोमनाथ काळे, उपसरपंच राधिकी सावंत, सयाजी सावंत, देवस्थान पुजारी सोमा सावंत आदींची उपस्थिती होती.

राणे पुढे म्हणाले की, कोपार्डे गाव निसर्गाने नटलेला आहे. येथील देवस्थानाच्या अगरशाळेचे काम लवकर पूर्ण केले जाईल. तसेच मंदिर परिसराचे सौंदर्यीकरण टप्प्याटप्प्याने केले जाईल. पर्ये आमदार डॉ. दिव्या राणे जे काम हाती घेतात ते त्या पूर्ण करतात. तुम्हाला एक धडाडीच्या आमदार मिळाल्या आहेत, असे ते म्हणाले.

यावेळी राणे दांपत्यांनी कोपार्डे येथील श्री ब्राम्हणी महामाया देवस्थानाला भेट घेऊन दर्शन घेतले. त्यानंतर इंदिरानगर व मंदिर परिसरात बैठका झाल्या. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Sattari
Fishing In Goa: गोव्यात कर्नाटक, महाराष्ट्रातील बोटींचा शिरकाव; पारंपरिक मच्छीमारांना मासळीचा तुटवडा

बेरोजगारांची समस्या सोडवू : दिव्या

आमदार दिव्या राणे म्हणाल्या की, गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने देशाबरोबर सत्तरीच्या विकासातही मोठा हातभार लावला आहे. आज कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प सत्तरीत येत आहेत.

भूमीगत वीज, रस्ते, जल पुरवठ्याच्या सुविधेत सुधारणा हे सर्व भाजपमुळेच शक्य झाले. बेरोजगारांची समस्या मोठी आहे. त्यासाठी कोणीही घाबरण्याची गरज नाही, टप्प्याटप्प्याने सर्वांची अपेक्षा पूर्ण केली जाईल, असे त्या म्हणाल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com