Panjim Municipality : पणजी महापौर-उपमहापौर बदलणार का? मंत्री बाबूश म्हणतात...

बदलाची शक्यता नसल्याची आमदार बाबूश मोन्सेरात यांची माहिती
Goa Panjim Municipality
Goa Panjim MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी महापौर-उपमहापौर पदाची 30 मार्चला मुदत संपत आहे. सध्या महापौरपदी असलेले आमदार पुत्र रोहित मोन्सेरात आणि उपमहापौरपदी असलेले संजीव नाईक यांच्याकडेच ही पदे राहणार असे स्पष्ट झाले आहे. महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दोन्ही पदांमध्ये बदल होणार नसल्याचे ‘गोमन्तक’ला सांगितल्याने आता त्यात बदलाची शक्यता मावळली आहे.

Goa Panjim Municipality
केटीसीला दररोज 10 लाख रुपयांचे नुकसान | KTC incurring loss of Rs 10 lakhs daily | Gomantak Tv

महापौर रोहित मोन्सेरात यांचे पद कायम राहिले तरी उपमहापौरपद बदलले जाऊ शकते, असे बोलले जात होते. पहिल्यांदा महापौरपद स्वीकारल्यानंतर रोहित यांच्याबरोबर वसंत आगशीकर यांनी एक वर्ष काम केले.

प्रभाग क्रमांक 25 मधील संजीव नाईक यांना उपमहापौरपद देण्यात आले. संजीव नाईक हे भाजपचे समर्थक मानले जातात. त्यामुळे त्याना त्यावेळी लॉटरी लागली होती, परंतु सध्या नाईक यांचे महौपारांशी व मिरामार कार्यालयाशी चांगलेच सूत जुळले. त्यामुळे ते पद कायम ठेवण्याचा कदाचित बाबूश यांनी निर्णय घेतला आहे.

Goa Panjim Municipality
Bondla Wildlife Sanctuary: बोंडलात येणार दोन अस्वल, दोन गवे जाणार मध्य प्रदेशला

महापौर म्हणून पुत्राला संधी दिल्याने बाबूश यांच्यावर अनेकांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली होती. परंतु महापालिकेत बाबूश यांनी भाजपप्रणित गटाची एकहाती सत्ता आणून दाखविली होती. त्यामुळे बाबूश सांगेल तोच महापौर-उपमहापौर होणार हे निश्‍चित होते.

उपमहापौरपदाचा संजीव नाईक यांचा कार्यकाळ एक वर्षाचा संपणार असल्याने त्याठिकाणी जाण्याची अनेकांनी असमर्थता दर्शविल्याचे माहिती पुढे आले आहे. सध्या आहे, तसेच राहू द्या, असेही काहींनी बाबूश यांना सांगितल्याने दोन्ही पदांमध्ये बदल होणार नसल्यावर त्यांनीही शिक्कामोर्तब केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com