आप जर गोव्यात आला तर गोव्याचे रक्षण गॉडलाच करावे लागेल

केजरीवाल गोव्यातही चर्च पाडणार का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव केला आहे.
गोवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव
गोवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमावDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नवी दिल्लीत पाडले गेलेले चर्च आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची त्याचवेळी गोवा भेट हा विरोधकांसाठी आयता विषय झाला आहे. काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी केजरीवाल यांना या मुद्द्यावर खिंडीत पकडताना केजरीवाल गोव्यात येऊनही चर्चेस मोडू पाहतात का, असा सवाल केला आहे. (Will Kejriwal destroyed churches in Goa: NCP)

कन्या वालंका आलेमाव हिच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आलेमाव यांनी ‘आप’ला गोव्यात थारा देऊ नका. अन्यथा आज जे दिल्लीत झाले, तेच कदाचित उद्या गोव्यात घडू शकते, अशी भीती व्यक्त केली.

गोवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव
Goa Politics: दिल्लीचा विकास गोमंतकीयांनी पहावा

गोव्यात होऊ घातलेल्या कोळशाच्या वाहतुकीबद्दलही केजरीवाल यांनी मौन बाळगले आहे. याकडे निर्देश करताना आलेमाव म्हणाले, जे गोव्यात कोळसा आणू पाहतात तेच आपला निधी देतात. त्यामुळे ते त्यांच्या विरोधात कसे बोलतील? सध्या आप गोव्यात जे रेशन वाटत आहे, तेही त्याच पैशातून असा आरोप त्यांनी केला. किनारपट्टी व्यवस्थापन आराखड्याविषयीं आलेमाव म्हणाले, जोपर्यंत किनारपट्टी भाग बंदर क्षेत्रातून बाहेर काढला जात नाही, तोपर्यंत माझा त्याला विरोध असेल. किनारपट्टी बंदराच्या अखत्यारीत गेल्यास मच्छीमार विस्थापित होतील, असे ते म्हणाले.

गोवा; राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव
Goa Politics: मगो पक्षाशी युतीबाबत केजरीवालांचे सूचक मौन

...तर गोव्याचे रक्षण देवालाच करावे लागेल

या चर्चसंबंधात गोव्यात त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, या घटनेची आपल्याला काही माहिती नाही, असे उत्तर केजरीवाल यांनी दिले होते. त्यावर भाष्य करताना आलेमाव म्हणाले, एवढी मोठी घटना घडते आणि त्या राज्याचे मुख्यमंत्री आपल्याला काही माहीतच नाही, असे म्हणतात. एखाद्या धार्मिक मुद्द्यावर कुठल्याही राज्यातील मुख्यमंत्री एवढे असंवेदनशील कसे असू शकतात? असा सवाल त्यांनी केला. असा आप जर गोव्यात आला तर गोव्याचे रक्षण देवालाच करावे लागेल, असेही आलेमाव म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com