प्रतापनगर डोंगरावर प्रचंड प्रमाणात डोंगर कापणी! वायनाडची स्थिती उद्भवण्याची भीती

Hill Cutting At Pratapnagar: डोंगर कापणी आणि माती पोखरून वायनाडप्रमाणे उर्वरित डोंगरच खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
Hill Cutting At Pratapnagar: डोंगर कापणी आणि माती पोखरून वायनाडप्रमाणे उर्वरित डोंगरच खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
Dharbandora Hill CuttingDainik Gomantak
Published on
Updated on

कुळे: धारबांदोडा पंचायतक्षेत्रातील बेतूल - प्रतापनगर भागात प्रचंड प्रमाणात डोंगर कापणी करून घरे बांधण्याचे सत्र सध्या सुरू असून डोंगर पोखरून घरे बांधण्याच्या या प्रकारामुळे वायनाड - केरळची स्थिती उद्भवण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी डोंगर कापणीला तलाठ्याला जबाबदार धरले आहे, पण इथे मात्र तलाठी मूग गिळून गप्प का, स्थानिक पंचायतीची यात काय भूमिका आहे, असा सवाल केला जात आहे.

बेतूल - प्रतापनगर भागात मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी करण्यात आली आहे. या ठिकाणी घरे बांधण्यात येत असून ती कायदेशीर की बेकायदेशीर हा प्रश्‍न उपस्थित होत असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी आणि माती पोखरून वायनाडप्रमाणे उर्वरित डोंगरच खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारी यंत्रणेने या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष केले असून वायनाड दुर्घटनेची वाट ही सरकारी यंत्रणा पाहत आहे का, असाही सवाल केला जात आहे.

मुख्यमंत्री म्हणतात, कारवाई करा!

वायनाडची शोकांतिका घडल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. कुठेही डोंगर कापणी आढळल्यास त्यासंबंधीचा अहवाल तलाठ्यांनी त्वरित जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला हवा, असा आदेशच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढला आहे.

निसर्ग वाचवण्यासाठी आणि धोका दूर करण्यासाठी सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे, पण सरकारी यंत्रणा त्यादृष्टीने काम करील काय,अशी विचारणा होत आहे.

रस्ते, वीज आधीपासूनच तयार

आश्‍चर्याची बाब म्हणजे या ठिकाणी वीज आणि रस्तेही तयार करण्यात आले आहेत. एखाद्या गावात जर रस्ता करायचा झाला तर किती कटकटी होतात, हे ग्रामस्थांनाच माहीत असते, पण येथे तर वीज उपलब्ध करण्याबरोबरच रस्तेही तयार करण्यात आले आहेत.

काही पक्क्या घरांचे बांधकाम बेतूल - प्रतापनगर भागातील या डोंगरावर सुरू असून या कामासाठी डोंगर कापणी केल्यावर ही माती कुठे टाकली जाते, त्याचा पत्ता नाही. हे प्लॉट तयार करून डोंगरांवर घाला घालण्यामागे कुणाचा हात आहे, याबाबत चर्चा होताना दिसत आहे.

Hill Cutting At Pratapnagar: डोंगर कापणी आणि माती पोखरून वायनाडप्रमाणे उर्वरित डोंगरच खाली येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे
Dharbandora Water Crisis: ...अखेर धुलैय गावाला पाणीपुरवठा सुरू

पूर्वी चिऱ्यांच्या खाणी...

या ठिकाणी म्हणे पूर्वी चिऱ्यांच्या खाणी होत्या. या खाणीही बेकायदेशीर होत्या. त्यातील काही खाणी बुजवण्यात आल्या आहेत. पैशांसाठी बिनधास्त डोंगर कापणी प्लॉट तयार करून ते विकले जात आहेत.

डोंगर कापणीसंंबंधी कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले आहेत का, डोंगर कापणी करताना त्याचा धोका किती आणि कसा होऊ शकतो, याचा संबंधितांनी विचार केला आहे का, असाही सवाल केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com