Dharbandora Water Crisis: ...अखेर धुलैय गावाला पाणीपुरवठा सुरू

Dhulai Village Water Issue: अधिकाऱ्यांना विचारला जाब, महिनाभर सुरू होती पाण्यासाठी वणवण
Dhulai Village Water Issue: अधिकाऱ्यांना विचारला जाब, महिनाभर सुरू होती पाण्यासाठी वणवण
Dhulai VillagersDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील धुलैय गावातील लोकांना गेला महिनाभर पिण्याचे पाणी मिळाले नसल्याने येथील महिलांनी ‘गोमन्तक’च्या पत्रकारांसमवेत धारबांदोडा येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा कार्यालयात जाऊन येथील अधिकाऱ्यांना जाब विचारला.

त्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने धुलैय गावात जाऊन पाण्याच्या पंपाची पाहणी केली. कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे ही समस्या निर्माण झाली होती. वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्वरित दुरुस्ती केली.

अखेर पंप सुरू झाल्याने प्रत्येकाच्या घरात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू झाल्याने स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. धुलैय गावातील लोकांनी ‘गोमन्तक टीव्ही’चे आभार मानले असून ‘गोमन्तक’मुळे आम्हाला पाणी मिळाले, असे सांगितले.

Dhulai Village Water Issue: अधिकाऱ्यांना विचारला जाब, महिनाभर सुरू होती पाण्यासाठी वणवण
Accident at Dharbandora - धारबांदोडा येथे अपघात, २ जखमी | Gomantak TV

अनेक अधिकारी अनुपस्थित

धुलैय ग्रामस्थांच्या समस्येची दखल घेऊन ‘गोमन्तक टीव्ही’च्या प्रतिनिधींनी बुधवारी सकाळी १०.३० वाजता धारबांदोडा येथील कार्यालयाला भेट दिली असता, अधिकाऱ्यांच्या बहुतांश खुर्च्या रिकाम्या होत्या. यासंदर्भात विचारले असता, उपस्थित कर्मचाऱ्यांनी मौन बाळगले. शेवटी साहाय्यक अभियंता आल्यानंतर ग्रामस्थांनी कैफियत मांडली आणि आम्हाला पाणी द्या, अशी मागणी केली. अखेर अधिकारी देविदास गावडे यांनी सहकाऱ्यांसोबत धुलैय गावात जाऊन पाण्याची समस्या सोडविली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com