RG इंडिया आघाडीचा भाग का नाही? वेळीतून आरजीच्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनी हकलले

RG Members In Velim Goa: पक्षाचा काही छुपा अजेंडा आहे का? आरजी मते फोडण्यासाठी उमेदवार उभा करत आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार स्थानिकांनी प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केला.
RG Members In Velim Goa
RG Members In Velim Goa

Goa Loksabha Election 2024

गोव्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. राज्यात भाजप, काँग्रेस आणि रिव्हॉल्युशनरी गोवन पक्ष दोन्ही मतदारसंघात कोपरा सभा, प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन प्रचार करताना दिसत आहेत.

दरम्यान, रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना वेळीत विचित्र अनुभवाला समोरे जावे लागले. एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी प्रचार करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना हकलून लावले.

नेमका प्रकार काय घडला?

रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे कार्यकर्ते दक्षिण गोव्यातील वेळीत प्रचार करण्यासाठी गेले होते. दरम्यान, गावातील ग्रामस्थांनी आरजी इंडिया आघाडीचा भाग का नाही? असा प्रश्न केला. आरजी एकट्याने का लढत आहे, पक्षाचा काही छुपा अजेंडा आहे का? आरजी मते फोडण्यासाठी उमेदवार उभा करत आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार स्थानिकांनी प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना केला.

एवढेच नव्हे तर ग्रामस्थांनी प्रचारासाठी आलेल्या कार्यकर्त्यांचा पाठलाग करुन त्यांना गावाच्या हद्दीबाहेर हकलून लावले. याबाबत एक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत असून, सदर प्रकार रात्रीच्या वेळेस घडल्याचे दिसत आहे.

RG Members In Velim Goa
सात दिवसांत युरी आलेमाव यांनी माफी मागावी; आरोलकरांबाबत वक्तव्यावरुन भंडारी समाज आक्रमक

समोर आलेल्या व्हिडिओनुसार आरजीचे कार्यकर्ते दुचाकीवरुन प्रचारासाठी गावात आहे. ग्रामस्थांनी त्यांना विविध प्रश्न केल्यानंतर त्यांनी दुचाकीवरुनच पळ काढल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, घडलेल्या प्रकाराबाबत आरजीकडून अद्याप कोणताही खुलासा अथवा माहिती समोर आलेली नाही.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आरजीने उत्तर गोव्यातून मनोज परब आणि दक्षिणेतून रुबर्ट परेरा यांच्या उमेदवारीची घोषणा केलीय. आरजीने अलिकडेच इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी तीन अटी ठेवल्या असून, त्यासाठी 20 एप्रिलपर्यंतीची मुदत दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com