सात दिवसांत युरी आलेमाव यांनी माफी मागावी; आरोलकरांबाबत वक्तव्यावरुन भंडारी समाज आक्रमक

Yuri Alemao Vs Jit Arolkar: भंडारी समाज युवा समितीच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समाजाच्या नेत्यांनी ही मागणी केली.
Yuri Alemao Vs Jit Arolkar
Yuri Alemao Vs Jit Arolkar

Yuri Alemao Vs Jit Arolkar

विरोधीपक्षनेते युरी आलेमाव यांनी मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देखील या वक्तव्याची दखल घेतल विरोधकांच्या भाषेबाबत आक्षेप व्यक्त केला होता.

दरम्यान, आता गोमंतक भंडारी समाज युवा समितीने देखील या वक्तव्याची दखल घेतली असून, युरी आलेमाव यांनी सात दिवसांत माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

भंडारी समाज युवा समितीच्या वतीन आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समाजाच्या नेत्यांनी ही मागणी केली.

भंडारी समाजाचे नेते जीत आरोलकर यांच्याबद्दल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केलेले विधान भंडारी समाज खपवून घेणार नाही. येत्या सात दिवसात युरी आलेमाव यांनी जाहिररित्या माफी मागावी अशी मागणी गोमंतक भंडारी समाज युवा समितीने पत्रकार परिषदेत केली.

लोकशाही वाचवण्याची भाषा करणाऱ्या आणि संविधान धोक्यात असल्याची अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना प्रत्यक्षात लोकशाहीच्या मूल्यांचा आदर नाही. विरोधी पक्षनेत्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्या विरोधात अत्यंत निंदनीय भाषा वापरली असून, विरोधकांचा लोकशाही आणि संविधानावरील पोकळ अजेंडा उघड झालाय.

भारताला लोकशाहीतील काळा क्षण (आणीबाणी) दाखवणाऱ्या INDI आघाडीचे नेतृत्व काँग्रेस करतेय हे लक्षात घेण्यासारखे आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आलेमाव यांच्या वक्तव्याचा निषेध करत टीका केली.

Yuri Alemao Vs Jit Arolkar
हिंदू आणि महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता; 200 वर्षापूर्वी पोर्तुगीज राजवटीत कशी व्हायची गोव्यात निवडणूक?

ढवळीकर आणि खलप

महाराष्ट्रवादी गोमन्तक पक्षाचे सुदिन ढवळीकर आणि आघाडीचे उत्तर गोवा उमेदवार रमाकांत खलप यांच्यात म्हापसा अर्बन बँकेवरुन वाद झाला. बँकेतील घोटाळ्याचा उल्लेख ढवळीकरांनी केल्यानंतर खलप यांनी कोणत्याही चर्चेसाठी तयार असल्याचे सांगितले होते.

दरम्यान, एमजीपीचा दुसरे नेते आरोलकर आणि काँग्रेसचे आलेमाव आता नव्या प्रकरणावरुन आमने-सामने आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com