Delhi CM Oath Ceremony: कोण होणार दिल्लीतील भाजप सरकारचा चेहरा? गोव्याचे मुख्यमंत्री शपथविधीला लावणार हजेरी

New Delhi Chief Minister Oath Taking Ceremony: २७ वर्षानंतर भाजपचे दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.
Goa CM To Attend New Delhi Chief Minister Oath Taking Ceremony
Delhi Chief Minister Oath Taking CeremonyDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दहा वर्षे दिल्लीत असलेल्या आप सरकारला भाजपने नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत सुरुंग लावला. ७० पैकी ४८ जागांवर विजय मिळवलेल्या भाजपचे २७ वर्षानंतर दिल्लीत सरकार स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. दिल्लीतील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी (२० फेब्रुवारी) होणार आहे. या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत देखील उपस्थिती लावणार आहेत.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत भाजप उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर प्रचार केला होता. सावंत यांनी उमेदवारांच्या रॅलीत सहभागी होत मतदारांना संबोधित देखील केले होते. मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी दिल्लीत सत्ता परिवर्तन होऊन भाजप सरकार स्थापन करेल, असा विश्वास देखील व्यक्त केला होता.

समोर आलेल्या निकालातून सावंत यांचा अंदाज खरा ठरला. भाजपने ४८ जागा मिळवत दिल्लीत मोठा विजय संपादीत केला. २७ वर्षानंतर भाजपचे दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे.

Goa CM To Attend New Delhi Chief Minister Oath Taking Ceremony
Delhi Election Result: मतदारांनी झाडू फिरवला; दिल्लीत 'आप'चा सुपडा साफ, भाजपचं कमबॅक; पराभवात काँग्रेसचं सातत्य, 5 मुद्दे

दिल्लीत स्थापन होणाऱ्या भाजप सरकारचा चेहरा कोण असणार याबाबत सध्या विविध चर्चा सुरु आहेत. याबाबत अधिकृत नाव समोर आले नसले तरी नवी दिल्लीतून विजयी झालेले परवेश वर्मा यांचे नावे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

परवेश वर्मा यांनी आप प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे ते जायंट किलर ठरले आहेत. शिवाय परवेश दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे पुत्र असल्याने त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक चर्चा होत आहे.

Goa CM To Attend New Delhi Chief Minister Oath Taking Ceremony
Lavoo Mamledar Death Case: लवू मामलेदार मृत्यू प्रकरणाचा तिढा वाढला; शवचिकित्सा अहवालातून महत्वाची माहिती उघड

याशिवाय मुख्यमंत्रीपदाच्या शर्यातील विजेंदर वर्मा यांच्या नावाची देखील चर्चा आहे. विजेंदर यांनी रोहिणी मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तसेच, सतीश उपाध्याय, विरेंद्र सचदेवा, हरिष खुराणा यांची नावे देखील दिल्ली मुख्यमंत्रीपदाच्या शर्यातीत आहेत. भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी जाहीर केल्याप्रमाणे नवा मुख्यमंत्री निवडून आलेल्या आमदारांपैकीच एक असणार आहे. त्यामुळे तो चेहरा कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे.

दरम्यान, दिल्ली मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा रामलिला मैदानावर सकाळी अकरा वाजता होणार आहे. या सोहळ्याला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, एनडीए आघाडीचे मुख्यमंत्री आणि नेते हजेरी लावणार आहेत. या सोहळ्याच्या तयारीची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि तरुण चुघ यांच्याकडे सोपवली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com