सर्वेद्वारे भवितव्य ठरवणारे हे कोण ? आमदार बाबुश मोन्सेरात यांचा संतप्त सवाल

2002 पासून लोक आपल्याला ओळखत असून आपली कामे लोकांना माहिती असल्याचा दावा मॉन्सेरात यांनी केला.
Panjim MLA Babush Monserrate
Panjim MLA Babush MonserrateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ताळगाव व पणजी मतदारसंघ भाजप आमदारांसाठी असुरक्षित असल्याच्या सर्वे वातानुकुलितमध्ये बसून करतात त्याला काहीच अर्थ नाही. तळागाळात जाऊन आमदारांनी केलेल्या कामाची माहिती घेण्याची गरज आहे. माझ्यासोबत लोक असल्याने अशा सर्वेची आवश्‍यकता नाही. मतदारसंघातील सर्वे करून आमचे भवितव्य ठरवणारे हे कोण अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार बाबुश मोन्सेरात (Panjim MLA Babush Monserrate) यांनी व्यक्त केली.

2002 मध्ये मी राजकारणात प्रत्यक्षात आलो. त्यापूर्वी लोकांना माझी ओळख नव्हती व मी सुद्धा राजकारणापासून दूर होता. 2002 ते आतापर्यंत लोक मला चांगले ओळखत आहेत तसेच माझी कामे त्यांनी पाहिली आहेत. काही 3-4 व्यक्ती वातानुकुलितमध्ये बसून आमदारांच्या कामाचा काही मतदारांशी संपर्क साधून सर्वे तयार करत आहेत. ताळगाव व पणजी हे तिसवाडीतील मतदारसंघ आहेत व यापूर्वीही मी तिसवाडीतील सर्व मतदारसंघात भाजप उमेदवार निवडून आणण्याचा दावा केला आहे तो खरा करून दाखवणार आहे. राज्यात पुढील निवडणुकीत भाजपचेच सरकार सत्तेवर येईल. या निवडणुकीत किमान २५ जागा भाजपला मिळतील असा ठाम विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Panjim MLA Babush Monserrate
मेरी इम्युक्युलेट चर्च येथे चित्रीकरणावेळी पर्यटकांची गर्दी

यावर्षी झालेल्या पणजी महापालिकेच्या निवडणुकीत पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी सर्व प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार निवडून येतील असा दावा केला होता मात्र त्यांचा हा दावा खरा ठरला नाही. त्यांना पाच ठिकाणी पराभूत पत्करावा लागला होता. त्यामुळे ते तिसवाडीतील पाचही मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकणार असे सांगत असले तर त्यावर भाजपने कोणतेच मत व्यक्त केलेले नाही. यापूर्वी नेहमीच तिसवाडीमध्ये पणजीतीलच जागा भाजपला मिळायची व उर्वरित काँग्रेसला त्या मिळायच्या. मात्र यावेळी बाबुश मोन्सेरात हे भाजपसाठी पाचही जागा जिंकून देऊन इतिहास घडविणार हे आगामी निवडणूक ठरवणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com