VIDEO: मॅनेजरने काम सांगितले, संतप्त वेटरने केला खुनी हल्ला; वागातोर परिसरात खळबळ

Waiter attacks manager vagator resort: : वागातोर येथील प्रसिद्ध ‘व्हाईट फ्लॉवर कॉटेजिस’ रिसॉर्टमध्ये सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Waiter attacks manager vagator resort
Waiter attacks manager vagator resortDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: वागातोर येथील प्रसिद्ध ‘व्हाईट फ्लॉवर कॉटेजिस’ रिसॉर्टमध्ये सोमवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. रिसॉर्टमधील एका वेटरने स्वतःच्या मॅनेजरवर सुरीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मॅनेजर सुनील सिंग (वय ३४) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हणजूण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सायंकाळी सुमारे ४.१० वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या बार काउंटर परिसरात घडली. संशयित आरोपी मोहम्मद अश्रफ (वय ३५, रा. दिल्ली) याला पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

Waiter attacks manager vagator resort
Goa Crime: दोन खुनांनी हादरला बार्देश, कळंगुट, बोडगिणीतील घटना; मित्राच्या पत्नीचा फोटो पाहण्याचा हट्ट भोवला

प्राथमिक चौकशीतून असे समोर आले आहे की, मॅनेजर सुनील सिंग हा वारंवार वेगवेगळी कामे सांगत असल्यामुळे अश्रफ संतप्त झाला होता. या कारणावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर मारामारीत झाले आणि रागाच्या भरात अश्रफने जवळ असलेली सुरी उचलून सुनील सिंग यांच्या मानेवर वार केला.

Waiter attacks manager vagator resort
Goa Crime: कौटुंबिक वादाचा भडका, मयेत सख्ख्या भावावर जीवघेणा हल्ला; संशयिताला बेड्या

या घटनेनंतर रिसॉर्टमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमी सुनील सिंग यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com