राज्य आर्थिक संकटात असताना सरकार नवे राजभवन बांधून पैशाची उधळपट्टी करतेय!

राज्य आर्थीक संकटात असताना नवे राजभवन बांधून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचेअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केला आहे.
Pradesh Congress President Girish Chodankar
Pradesh Congress President Girish Chodankar Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोनापावला येथे नवीन राजभवन इमारत बांधण्यास राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Governor Sreedharan Pillai) यांनी मंजुरी दिल्यामुळे गोवा सरकारने (Government of Goa) नवीन राजभवन बांधण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दुसरीकडे राज्य आर्थीक संकटात असताना नवे राजभवन बांधून सरकार पैशाची उधळपट्टी करत असल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचेअध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी केला आहे. तसे पाहता माजी राज्यपाल सत्यपाल मलीक यांच्याकाळात गोवा सरकारने नवे राजभवन बांधण्याचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र मलीक यांनी तो फेटाळला होता. त्यानंतरच्या राज्यपालांच्या काळातही याबाबतचा प्रस्ताव रखडला होता. नवे राज्यपाल पिल्लई यांच्यासमोर सरकारने नव्या राजभवनाचा ठेवलेला प्रस्ताव राज्यपालानी मंजूर केला आहे.

Pradesh Congress President Girish Chodankar
Goa Election: रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उपरती

दरम्यान कोरोना महामारीमुळे (Covid 19) राज्याची अर्थीक स्थिती कमजोर झाल्याचे खुद्द मुख्यमंत्री सांगत असताना गरज नसताना नवे राजभवन बांधण्याचे प्रयत्न हे भ्रष्टाराचाचेच उदाहरण असल्याची टीका गिरीश चोडणकर यांनी केली आहे. माजी राज्यपाल मलीक (Former Governor Malik) यांनी नव्या राजभावनाचा प्रस्ताव फेटाळल्यामुळेच त्यांची लगेच बदली केली गेली. असा आरोप चोडणकर यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com