गोव्यातील पोलिस मतदान कधी करणार?

गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असले तरी मतदान प्रक्रिया अजूनही पोस्टल बॅलेटच्या स्वरूपात सुरूच आहे.
Goa Police
Goa Police Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील शेकडो पोलिसांनी विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही आपले मत नोंदवलेले नाही. भारतीय राखीव बटालियन (IRB) चे कर्मचारी आणि गोवा पोलिस 13 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत निवडणुकीच्या कामात व्यस्थ होते. त्यांचे अजून मतदान झालेले नाही. निवडणुकीच्या कामासाठी उत्तर प्रदेशला (Uttar Pradesh) जाणाऱ्या भारतीय राखीव बटालियन (IRB) चे कर्मचारी मतदान कसे करणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. (Goa Police News)

Goa Police
गोव्यात उमेदवारांचे लक्ष पोस्टल बॅलेटवर

IRB कर्मचारी 15 फेब्रुवारीला गोव्यातील निवडणुकीचे काम संपवून काही तासातच उत्तर प्रदेशला रवाना झाले. 7 मार्च रोजी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत IRB कर्मचाऱ्यांना निवडणूक ड्यूटीवर कार्यरत रहावे लागणार आहे. 9 मार्च ही बॅलेट मतदानाची शेवटची तारीख आहे. "आम्हाला गोव्याला (Goa) कधी परतायला मिळेल याची स्पष्टता नाही. ट्रेनमधून प्रवास करताना मतदान करण्याची सोय केली तरी हे मतदान पारदर्शकपणे होईल आणि बॅलेट कोणत्याही प्रकारच्या छेडछाडीशिवाय निवडणूक आयोगाकडे पोहचेल, याची काय खात्री आहे?" असा प्रश्न एका कर्मचाऱ्याने उपस्थित केला.

Goa Police
गोव्यात एप्रिलमध्ये होणार दहावी आणि बारावीची दुसरी सत्र परीक्षा

उमेदवार आणि कार्यकर्ते अजूनही सक्रिय

गोव्यात 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले असले तरी मतदान प्रक्रिया अजूनही पोस्टल बॅलेटच्या स्वरूपात सुरूच आहे. परिणामी मुख्य मतदान होऊन सुद्धा ऊमेदवार आणि कार्यकर्ते अजूनही सक्रिय आहेत. मतदान केंद्रातील मतदानात जर दोन उमेदवार बरोबरीच्या आकड्यांवर राहिले तर हे पोस्टल बॅलेट महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सरकारी कर्मचारी पोस्टल बॅलटद्वारे आपले मत नोंदवणार आहेत. निवडणुकीच्या दिवशी विविध मतदान केंद्रे तसेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून (Election Commission) पोस्टल बॅलेट देण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com