Goa Politics: कुडचडे भाजप मंडळ जेव्हा निरूत्तर होते...

Goa Politics: कुडचडे भाजप मंडळाने आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन दैनिक ‘गोमन्तक’ ने कुडचडेचे आमदार तथा मंत्री नीलेश काब्राल यांच्याविषयी आज प्रसिद्ध केलेल्या बातमीचा निषेध करून आपला राग व्यक्त केला.
Goa Politics
Goa PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics: कुडचडे भाजप मंडळाने आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन दैनिक ‘गोमन्तक’ ने कुडचडेचे आमदार तथा मंत्री नीलेश काब्राल यांच्याविषयी आज प्रसिद्ध केलेल्या बातमीचा निषेध करून आपला राग व्यक्त केला. पण ‘गोमन्तक’ ने उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे उत्तर विश्‍वास सावंत देसाई आणि अन्य पदाधिकाऱ्यांना देता आले नाही.

Goa Politics
Special Railway: नाताळनिमित्त खास रेल्वे गाड्या

त्यातच पत्रकार परिषद सुरू असताना काब्राल यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी प्रसिद्ध होताच कुडचडे भाजप मंडळाच्या या पत्रकार परिषदेची हवाच निघून गेली.

आज कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत देसाई, नगराध्यक्ष प्रदीप नाईक, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ गावस देसाई,नगरसेवक टोनी फर्नांडिस, ऋचा वस्त, जसमीन ब्रागांझा, सरपंच कविता गावस देसाई, युवा मंडळ अध्यक्ष निखिल शिरोडकर व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Goa Politics
Goa Sports News: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेवेळी 151 खेळाडूंवर उपचार

मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांना या भरती प्रक्रियेविषयी ही प्रक्रिया पारदर्शक होती का, असा प्रश्न विचारल्यावर ते भांबावून गेले. जर ती पारदर्शक होती तर निवडलेल्या उमेदवारांची नावे जाहीर का केली नाहीत, फक्त त्यांचे आसन क्रमांकच का दिले गेले, असा सवाल केला असता ते गडबडले.

ही प्रक्रिया योग्य होती एवढेच ते म्हणत होते. मग काब्राल यांना राजीनामा का द्यावा लागला, असे विचारले असता, त्यांनी राजीनामा दिला आहे, हे आम्हाला अधिकृतपणे कुणी सांगितलेच नाही असे म्हणून त्यांनी स्वतःचेच हसे करून घेतले.

त्यानंतर त्यांनी ही पत्रकार परिषद कशीबशी आटोपती घेतली. आज कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेला मंडळ अध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांच्यासह नगराध्यक्ष प्रदीप नाईक, जिल्हा पंचायत सद्स सिद्धार्थ गावस देसाई, नगरसेवक टोनी फेर्नांडिस, ऋचा वस्त, जसमीन ब्रागांझा, सरपंच कविता गावस देसाई, युवा मंडळ अध्यक्ष निखिल शिरोडकर व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

सरळ सरळ धमकी

‘गोमन्तक’ने जे आरोप केले आहेत, ते त्यांनी सिद्ध करून न दाखवल्यास त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करण्यात येणार असून तसेच सदर वृत्तपत्राची कुडचडेत विक्री होऊ देणार नाही,असा इशारा यावेळी विश्‍वास सावंत देसाई यांनी दिला. सावंत देसाई यांनी दिलेला हा इशारा एका प्रकारे सरळ सरळ धमकीच होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com