पक्षाच्या निर्णयाचे स्वागत करणे तृणमूल काँग्रेसचे धोरण:लुईझिन फालेरो

दरम्यान विजय सरदेसाई यांच्यावर, अ‍ॅड सियोला वाझ यांचा निशाणा
Luizinho Faleiro in Press 
conference
Luizinho Faleiro in Press conferenceDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा: तृणमूल काँग्रेस शुक्रवारी अ‍ॅड सेओला वाझ यांना फातोर्डा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. पत्रकार परिषदेत याची घोषणा करताना AITC चे राष्ट्रीय उपाध्यक्ष लुईझिन फालेरो म्हणाले की, "मी फातोर्डा येथून गोवा टीएमसीचे उमेदवार म्हणून माघार घेत आहे. तसेच तरुण व्यावसायिक, तरुण वकील अ‍ॅड सियोला वाझ यांच्याकडे बॅटन सोपवत आहे. पक्षाच्या या निर्णयाचे मी स्वागतच करतो, आणि हेच आमच्या पक्षाचे धोरण आहे." (Welcoming decision of party is policy of Trinamool Congress satment by Luizinho Faleiro)

Luizinho Faleiro in Press 
conference
मुरगाव नगरपालिकेच्या अर्धवटपणामुळे पार्किंग व्यवस्थेचे वाजले तीन-तेरा

दरम्यान विजय सरदेसाई Vijay sardesai यांच्यावर निशाणा साधत अ‍ॅड सियोला वाझ म्हणाल्या की, "अस्थिर सरकार दिले असून आता आम्हाला सरकार म्हध्ये स्थिरता हवी आहे. सुस्थित राज्य येण्यासाठी आम्हाला भाजप आणि गोवा फोरवरची Goa Forward जागा दाखवून देणे गरजेचे आहे. आम्हाला गोव्याची नवी सकाळ दाखवायची आहे."उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अ‍ॅड सियोला वाझ यांनी उमेदवारी दाखल केली आहे.

म्हणून लुईझिन फालेरो होते नाराज

तृणमूल काँग्रेसने फातोर्डा मतदारसंघातून सेओला वाझ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी तृणमूल काँग्रेसचे खासदार लुईझिन फालेरो Luizinho Faleiro यांचं नाव घोषित करण्यात आलं होतं. मात्र पक्षाच्या या निर्णयावर लुईझिन फालेरो यांनी नाराजी व्यक्त केली होती. उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी तृणमूल काँग्रेस पक्षाने आपल्याला विचारात घेतलं नसल्याने त्यांनी नाराजी उघड केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com