गोव्यातील वीज ग्राहकाला फसवणाऱ्यांवर कडक कारवाई करू: सुदिन ढवळीकर

फर्मागुढीत उभारणार एक मेगावॅट वीज प्रकल्प: वीजमंत्री सुदिन ढवळीकर
Sudin Dhavalikar
Sudin DhavalikarDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: विजेबाबत गोवा राज्य स्वयंपूर्ण करण्याबरोबरच ग्राहकाचे समाधान केंद्रबिंदू मानून वीज खात्यात आमूलाग्र बदल करण्यात येतील, त्याचबरोबर फर्मागुढी येथे एक मेगावॅट सोलर एनर्जी वीज निर्मिती प्रकल्पाची उभारणी करणार असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. (We will take strict action against those who cheat electricity consumers in Goa says Sudin Dhavalikar)

Sudin Dhavalikar
लाखो रुपये खर्चून बांधलेल्या सारमानस स्मशानभूमीचे बुधवारी होणार लोकार्पण

विजेसंबंधी विविध कारणांवरून चार हजार नऊशे अर्ज प्रलंबित त्यातील अडीच हजार अर्ज निकाली काढण्यात आले असून ग्राहकांना सुविहित सेवा देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशी ग्वाहीही सुदिन ढवळीकर यांनी दिली.

वीज ग्राहकाला फसवण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडले आहेत, विशेषतः अवैध मार्गाने काही आस्थापनांना चोरट्या मार्गाने वीज देण्यासाठी काही झारीतील शुक्राचार्य वावरतात, त्यांना बाजूला सारण्यात आले असून असे प्रकार कुठे घडत असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, त्यामुळे शिस्त ठेवा आणि योग्य वर्तन करा असा इशाराच वीजमंत्र्यांनी या चोरट्यांना दिला.

Sudin Dhavalikar
अपघातांचं सत्र सुरुच, रायबंदरजवळ कार खाडीत पडली

सुदिन ढवळीकर म्हणाले, वीज, पाणी (Water) हे ग्राहकांचे जिव्हाळ्याचे विषय आहेत. आपण सार्वजनिक बांधकाम खात्याचा मंत्री असताना ग्राहकाला चांगले ते देण्याचा सातत्याने प्रयत्न केला, आता वीज खात्याचा ताबा आपल्याकडे आला असल्याने लोकांच्या समस्या आधी दूर करून वीजवहन सुरळीत करण्याबर भर दिला जाईल. मुळात लोडशेडिंगची समस्या दूर करण्यासाठी नियोजन करण्यात येत असून कमी दरात वीज खरेदी करून लोडशेडिंगची समस्या निकाली काढण्यात येईल. लोडशेडिंग (Load-shedding) आणि वीजवहनातील इतर समस्या तसेच ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा मिळण्याबाबत होणारी अडचण दूर करण्यासाठी आपण या खात्याच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली, समस्या जाणून घेतल्या, आणि लोडशेडिंगची समस्या दूर करण्यासाठी तसेच सुमारे पाच हजार कोटी रुपयांची वीज खात्याशी संबंधित भूमिगत वीजवाहिनी व इतर साहित्य खरेदीसाठी प्रस्ताव तयार करून तो वित्तीय मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिला असल्याची माहिती सुदिन ढवळीकर यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आपण वीज खात्यातील विविध समस्या दूर करण्यासाठी संयुक्त प्रयत्न करणार असून ग्राहकांना चांगले ते देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले. राज्यातील उद्योग प्रकल्पांना तसेच हॉटेल व्यावसायिक व इतर आस्थापनांना पुरेशी वीज मिळेल, याकडे आपला कटाक्ष असेल, असेही ढवळीकर म्हणाले.

विजेच्या सुरळीत वितरणासाठी आणि ग्राहकांना योग्य सुविधा उपलब्ध करण्यासाठी नवीन उप वीज केंद्रे सुरू करण्यात येणार असून त्यात वेर्णा, साकवाळ व फोंडा आदीचा समावेश असेल. राज्यात अन्य आवश्‍यक त्या ठिकाणी अन्य वीज उपकेंद्रांचे काम हाती घेण्यात येईल, तसेच भूमिगत वीजवाहिनी घालण्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

तमनार वीज प्रकल्पासंबंधी बोलताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर म्हणाले, सुपा - कर्नाटकातून येणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गानेच तमनार वीज प्रकल्पासाठी वाहिन्या आणण्यात येतील, त्यामुळे कुणाला त्रासदायक ठरणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल.

वीज खात्यात महसूल वाढीसाठी प्रयत्न करण्याबरोबरच विनाखंड विजेसाठी कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. पावसाळ्यात विजेची समस्या जास्त करून उद्भवत असल्याने दुरुस्ती तसेच इतर कामासाठी आवश्‍यक सूचना देण्यात आल्या आहेत, एकंदर वीज खात्याचा चेहरामोहरा बदलून ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी आपण कार्यरत राहू असे सुदिन ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com