फातोर्डा मतदारसंघाचा आपल्याला सर्वांगिण विकास करायचा आहे

जनता दरबारात डझनभर समस्या सोडविण्याचे विजय सरदेसाई यांचे आश्वासन
Vijay Sardesai News | Fatorda constituency News
Vijay Sardesai News | Fatorda constituency NewsDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी; आपल्याला फातोर्डा मतदारसंघाचा विकास करायचा आहे. मतदारसंघातील सर्व नागरिकांना बरोबर घेऊन व त्यांच्या समस्या जाणून हा विकास आपल्याला साधायचा आहे. यात राजकारणाला तिळमात्रही थारा दिला जाणार नाही. त्यामुळेच भाजपचे नगरसेवक सदानंद नाईक यांनासुद्धा आपण खास आमंत्रण दिले होते, असे आमदार विजय सरदेसाई यांनी रविवारच्या आपल्या नागरिक दरबारात स्पष्ट केले. ( We want all round development of Fatorda constituency - Vijay Sardesai )

Vijay Sardesai News | Fatorda constituency News
गोव्यात 'ओला'साठी सरकार सकारात्मक

आजच्या जनता दरबारात मडगाव नगरपालिकेच्या 1 ते 6 प्रभागांतील नागरिक, नगराध्यक्ष लिंडन परेरा, नगरसेवक व सरकारी अधिकारी उपस्थित होते.आज जवळ जवळ नागरिकांच्या डझनभर समस्यांवर चर्चा व विचारविनिमय झाला, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले. यात वीजपुरवठा, पाणीपुरवठा, सांडपाणी, कचरा, आरोग्य. वाहतूक शिस्त व पार्किंग, भटकी कुत्री व गुरांची समस्या, विद्यार्थ्यांसाठी बस सेवा अशा समस्यांवर यावेळी चर्चा झाली. यातील काही प्रश्‍न विधानसभेत मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Vijay Sardesai News | Fatorda constituency News
गोव्यात कोरोनाचे दोन बळी; नव्या 112 रुग्णांची भर

शांतादुर्गा शिक्षण समितीचे कार्य गौरवास्पद - वीजमंत्री सुदिन ढवळीकर

शांतादुर्गा शिक्षण समितीने शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य गौरवास्पद असे असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी या शिक्षण समितीने आतापर्यंत केलेल्या कार्यामुळे आज मडकई मतदारसंघातील अनेक युवक मोठ्या पदांवर पोचले असल्याचे उद्गार मडकईचे आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com