गोव्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता लक्ष देण्याची गरज - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

We need to pay attention to the growing prevalence of corona in Goa - Prime Minister Narendra Modi 
We need to pay attention to the growing prevalence of corona in Goa - Prime Minister Narendra Modi 
Published on
Updated on

नवी दिल्ली : गोव्यात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता आपल्याला गोव्याकडे (Goa) जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कोरोनाच्या (Covid-19) दुसऱ्या लाटेसंर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज राज्यांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय आधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

आपली संवेदनशिलता आणि आपले धेय्य याला या लढाईमध्ये फार महत्त्व आहे. ही भावना तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. आत्ता तुम्ही ज्या पद्धताने काम करत आहात, त्यापेक्षा अजून जास्त ताकदीने काम करण्याची गरज आपल्याला आहे. तुम्हाला सर्वव्यवस्थांवर लक्ष द्यावे लागणार आहे. आजच्या या परिस्थितीने तुम्हाला तुमच्या क्षमता नव्याने तपासून घेण्याची संधी दिली आहे. मागील काही दिवसांत देशातील ऍक्टीव्ह (Active) रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असली तरी जोपर्यंत शेवटचा रुग्ण आहे, तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यावीच लागणार आहे. मागील महामारीने किंवा आत्ताच्या महामारीने आपल्याला काही ना काही शिकविले आहे. असेही पंतप्रधानांनी नमूद केले. 

दरम्यान, गोव्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख पाहता पंतप्रधानांनी आज राज्यांचे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि प्रशासकीय आधिकारी यांना संबोधित करताना विशेषत्वाने गोव्याचा उल्लेख करत तेथे जास्त लक्ष देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com