Waterfalls In Goa : पावसाळी धबधब्यांनी दिली म्हादईला श्रीमंती; हुल्लडबाजी नको

स्थानिकांचे पर्यटकांना आवाहन
Goa waterfalls
Goa waterfallsDainik Gomantak

Sattari waterfalls : सत्तरी तालुक्याला चारही बाजूंनी निसर्गसौंदर्याचे देणे लाभले आहे. अशा निसर्गाच्या कुशीत जैवसंपदेचा अधिवास दडलेला आहे व त्यातून वाहणारे निसर्गरम्य परिसरातील धबधबे आकर्षण ठरले आहे. या धबधब्यांनी जंगलाला वेगळेपण देऊ केले आहे.

सत्तरीत काही धबधबे पावसाळ्यात वाहत असतात. सध्या पावसाळी हंगामात म्हादईच्या वन क्षेत्रात धबधबे प्रवाहीत झाल्याने आकर्षण वाढले आहे.

सत्तरी तालुक्यातील वायंगिणी गावापासून काही अंतरावर असलेला धबधबा हा बारमाही वाहत असतो. तो आता पावसाळ्यात अधिक प्रवाहीत झालेला आहे. असे बरेचसे धबधबे जंगलाचा श्वास म्हणावा लागेल.

नानोडा गावापासून वायंगिणी गावाच्या नजीक असलेला वायंगिणी धबधबा म्हणजे थंड पाणी व धबधब्याच्या बाजूने निर्माण झालेली निसर्गाची सुंदर जैवसंपदा. या गावाच्या शेजारी व सभोवताली समृद्ध अशी जंगल समृध्दी असून हे जंगल सुरक्षित असल्यामुळे नैसर्गिकपणे पाण्याचे स्तोत्र निर्माण होऊन हा धबधबा निर्माण झालेला आहे.

Goa waterfalls
River Rafting Goa : म्हादईच्या प्रवाहावर ‘व्हाईट वाॅटर राफ्टिंग’चा थरार; देशी-विदेशी पर्यटक सहभागी

बाटल्या व कचरा टाकू नये

सत्तरीच्या निसर्गसुंदर परिसरात अनेक पावसाळी धबधबे प्रवाहीत झाल्याने निसर्ग सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमी पर्यटकांनी बियर, दारूच्या बाटल्या, प्लास्टिक व इतर कचरा इतरत्र टाकून निसर्ग सौंदर्यात बाधा आणू नये अशी विनंती स्थानिक नागरिक करीत आहेत.

मद्यपान टाळावे

अनेक निसर्गप्रेमी या धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी व छायाचित्रे घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. आपला निसर्ग सांभाळण्यासाठी अशी धबधब्यांची काळजी घेतली पाहिजे. अशा नयनरम्य ठिकाणी कचरा होणार नाही याची दक्षता घेणे जरूरीचे आहे.

नानेली, कोपार्डे, चरावणे, शेळप आदी गावांतही धबधबे प्रवाहीत होऊ लागले आहेत. लोकांनी संयम बाळगावा, मद्यधुंदपणा टाळावा, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com