Goa Water Issue: जांबावलीत जलवाहिनी फुटल्याने पाणी वाया

Goa Water Issue: सदर जलवाहिनी फुटतात, तेथे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी पळ काढल्याचे राजेश जांबावलीकर या स्थानिकाने सांगितले.
Goa Water Issue
Goa Water IssueDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Water Issue: शिरवई ते नेत्रावळीपर्यंत नवीन जलवाहिनी घालण्याचे काम सध्या जोरात सुरू असून यासाठी जेसीबी द्वारे खोदकाम करून पाईप घालण्याचे काम सुरू असताना आज सकाळी आठ वाजता जांबावली येथर काम सुरू असताना जुनी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

Goa Water Issue
Goa Rape Case: मुलीवर बलात्कार; पित्याला जामीन नामंजूर

सांगे मतदारसंघातील ग्रामीण भागात साळावली धरणाचा पाणी पुरवठा करण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून यासाठी मुख्य रस्त्याच्या बाजूला खोदकाम करण्यात येत आहे.

आज सकाळी जांबावली येथे नवीन जलवाहिनीसाठी चेंबर बांधण्यासाठी खोदकाम करताना जांबावली,रिवण व इतर भागासाठी पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले.

सदर जलवाहिनी फुटतात, तेथे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांनी पळ काढल्याचे राजेश जांबावलीकर या स्थानिकाने सांगितले.

सदर कामासाठी खोदकाम सुरू त्यांना मार्गदर्शन करणारे संबंधित खात्याचे कोणीच उपस्थित नसतात, असेही जांबावलीकर यांनी सांगितले. खात्याने पर्यवेक्षकाची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com