Tilari Dam: तिळारी कालवा दुरुस्तीसाठी दोन महिने पाणीपुरवठा ठप्‍प; 15 पासून काम

उत्तर गोव्‍यावर परिणाम शक्य
Tilari Dam
Tilari DamDainik Gomantak
Published on
Updated on

Tilari Dam Will Be Closed: महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने तिळारी कालवा दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्‍यामुळे १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर हे दोन महिने गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. त्‍याचा उत्तर गोव्यावर परिणाम होऊ शकतो.

दरम्‍यान, या काळात अस्नोडा, अंजुणे येथून उत्तर गोव्याला पर्यायी पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती जलस्त्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली.

Tilari Dam
Bardez Power Shut Down: बार्देश तालुक्यात 11 ऑक्टोबर रोजी वीजपुरवठा राहणार बंद

सिंधुदुर्ग बांधकाम खात्याचे अधीक्षक अभियंता विजय थोरात म्हणाले की, तिळारी कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. काही ठिकाणी कालव्याच्या कडा कोसळल्या आहेत तर काही ठिकाणी नव्याने पूल उभारणी करण्यात आली आहे.

तळदुरुस्ती आणि कालवा बांधणी अत्यावश्यक असून हे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यामुळे पाणी गळती मोठ्या प्रमाणात होते. शिवाय याचा फटका स्थानिक शेतकऱ्यांना बसतो.

"तिळारी कालवा दुरुस्‍तीचे काम आता अनिवार्य बनले आहे. त्‍यामुळे गोवा सरकारच्या जलस्त्रोत खात्याला माहिती देऊन पाण्‍याची पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले आहे."

"१५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हे काम प्राधान्याने करण्यात येईल. एखाद-दुसरा आठवडा वाढूही शकतो. मात्र काम तातडीने पूर्ण करण्यावर आमचा भर असेल."

- विजय थोरात, सिंधुदुर्ग बांधकाम खाते अधीक्षक अभियंता

"डिसेंबर महिना हा पर्यटन हंगाम असल्यामुळे हे काम १० डिसेंबरपर्यंत संपवण्याची विनंती आम्ही महाराष्ट्र सरकारला केली आहे. या काळात उत्तर गोव्याला अस्नोडा तसेच वाळवंटी नदीतून पाणीपुरवठा केला जाईल. मागच्या वर्षी अस्नोडा येथून कळंगुटला पाणी देण्यात आले होते. आता केवळ पर्वरीचा विषय उरला आहे. त्‍याबाबतही विचार सुरू आहे."

- सुभाष शिरोडकर, जलस्त्रोतमंत्री

Tilari Dam
Pernem Zoning Plan: पेडणेचा झोनिंग प्‍लॅन स्थगित : नगरनियोजनमंत्री राणे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com