वाळपई: जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे सत्तरीत हाहाःकार माजला होता. वीज वाहिन्या तुटून वीज पुरवठा बंद झाला होता. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. त्यातच मुसळधार पावसामुळे जमिनीही खचल्या होत्या.
अशातच नगरगाव पंचायत क्षेत्रातील बांबर येथील सरकारी विहीर पूर्णपणे कोसळली होती. त्यामुळे नानोडावासीयांना पाणीपुरवठा पूर्णतः बंद झाला होता. विहीर कोसळल्याने पाणी अतिशय घाण झाले होते. त्यानंतर बांबर गावचे ज्येष्ठ नागरिक विष्णू जोशी यांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या जागेतील विहिरीचे पाणी नानोडावासीयांना पुरवण्यास मंजुरी दिली. पाणीपुरवठा विभागाने तातडीने अवघ्या वीस पंचवीस दिवसांतच काम हाती घेऊन पूर्ण केले.
काल गुरुवारी जोशी यांनी नानोडावासीयांना अन्य व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात विहिरीतून पाणीपुरवठा सुरू केला आहे. पुजारी श्रीधर जोग यांच्या मार्गदर्शनाखाली यजमान तेजस गावकर यांनी गणपती पूजन केले.
आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी कोसळलेल्या विहिरीच्या घटनेची दखल घेऊन सरकारच्या सहकार्याने नळ जोडणीची कार्यवाही पूर्णत्वास नेली. यावेळी विहीरीचे पाणी देणारे मालक विष्णू जोशी, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी व अन्य नागरिक उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.