‘ओपा’तील पाणीसाठा सव्वा मीटरने घटला!

मान्सूनपूर्व पाऊस नसल्याने पाण्याची पातळी किंचित उतरली
OPA Water Treatment Plant
OPA Water Treatment PlantDainik Gomantak
Published on
Updated on

फोंड्यासह तिसवाडी तालुक्याला पाणीपुरवणाऱ्या ओपा जल प्रकल्पातील पाणी पातळी सव्वा मीटरने खाली उतरली असून साळावली धरणातील पाणी ओपासाठी (गुरुवारी) सोडण्यात आले.

दरम्यान, ओपा जल प्रकल्पाला गांजे प्रकल्पातून सोडण्यात येणारे पाणी गेले दोन दिवस तांत्रिक कारणामुळे बंद असल्याने (बुधवारी) ओकांब बंधाऱ्याचे पाणी ओपासाठी सोडण्यात आले, त्यामुळे पाण्याची पातळी योग्य राखण्यात खात्याला यश मिळाले आहे.

OPA Water Treatment Plant
Mapusa News: सेंद्रिय शेतीद्वारे मधमाशी पालन !

गतवर्षी ओपाची जलपातळी गेल्यावर्षी 23 मार्चला 4.60 मीटर होती. तीच जलपातळी आज (गुरुवारी) 3.31 मीटर दिसली. मात्र साळावलीचे पाणी सोडल्यानंतर ही पातळी वाढण्यास मदत झाली. पाण्याचा चढउतार हा होतच राहतो, त्यातच यंदा मान्सूनपूर्व पाऊस नसल्याने पाण्याची पातळी किंचित उतरली असली तरी धास्तीचे कारण नाही, असे जलस्त्रोत अभियंत्यांनी स्पष्ट केले.

‘ओपा’तील पाणीसाठा उन्हाळ्यात योग्य राखण्यास दूधसागर नदीवरील बंधाऱ्यांचे पाणी वापरले जाते. ‘ओपा’त जलसाठा धोका रेषेवर आल्यानंतर हे पाणी सोडण्यात येते. त्यामुळे पाणी पुरवठा योग्य होण्यास मदत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com