Water Shortage: उंडिर-बांदोडा भागात तीव्र पाणीटंचाई; टँकरवरच भिस्त त्रस्त रहिवाशांचा अधिकाऱ्यांना विचारला जाब

Water Shortage In Undir Bandora: उंडिर - बांदोडा भागात गेले चार महिने व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे येथील नागरिकांना टँकरवर निर्भर रहावे लागते.
Water Shortage
Water ShortageDainik Gomantak

Water Shortage In Undir Bandora

उंडिर - बांदोडा परिसरात पाणी नसल्याने लोकांचे अतिशय हाल होत असून गेले चार महिने हा प्रकार चालल्याने अखेर संतप्त नागरिकांनी दाग - फोंड्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाला धडक देत अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला. यावेळी ग्रामस्थांसमवेत ‘आरजी’चे कार्यकर्ते उपस्थित होते.

उंडिर - बांदोडा भागात गेले चार महिने व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही, त्यामुळे येथील नागरिकांना टँकरवर निर्भर रहावे लागते. पण सध्या दाग - फोंडा येथील पाणी पुरवठा कार्यालयातील दोनपैकी एक टँकर नादुरुस्त असून एकाच टँकरवर फोंडा तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी आहे.

काही ठिकाणी खाजगी टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो, पण तो अपुरा असल्याच्या फोंडा तालुक्यातील नागरिकांच्या तक्रारी आहेत.

उंडिर भागातील एकदम टोकाला असलेल्या लोकांना ही पाणी पुरवठ्याची समस्या सतावत आहे. त्यामुळे आज (बुधवारी) सकाळी येथील नागरिकांनी आरजीचे कार्यकर्ते विश्‍वेश नाईक व प्रेमानंद गावडे तसेच इतरांच्या साथीने पाणी पुरवठा कार्यालयाला धडक देत जाब विचारला.

Water Shortage
AAP On Goa CM: 'आप' नेते कोणालाच घाबरलेले नाहीत, मुख्यमंत्र्यांना 'भिवपाची गरज आसा'

दरम्यान, उंडिर भागात मलनिस्सारण प्रकल्पाच्या कामात एका जलवाहिनी नादुरूस्त झाली असून ही जलवाहिनी बंद ठेवण्यात आली असून दुसऱ्या जलवाहिनीतून लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे, मात्र लोकांच्या म्हणण्यानुसार हा पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही.

त्यावर नादुरुस्त जलवाहिनी दुरुस्त करून लोकांना पुरेसा पाणी पुरवठा केला जाईल, असे या खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पुढील सहा महिन्यात या ठिकाणी नवीन जलवाहिनी टाकण्याचेही ठरले असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

...तर घागर मोर्चा आणू !

उंडिर येथील मंदावती नाईक, श्रेया नाईक, सुभाष नाईक यांनी सांगितले,की पाणी नसल्याने येथील लोकांचे अतिशय हाल होत आहेत. संबंधित प्रशासनाने त्वरित आमची पाणी समस्या सोडवावी. अन्यथा पाणी पुरवठा कार्यालयावर आम्ही घागर मोर्चा आणू,असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com